दोन दुचाकीच्या अपघातात एक ठार चार जखमी

दोन दुचाकीच्या अपघातात एक ठार चार जखमी
मूल तालुक्यातील घटना


मूल (अमित राऊत)
मूल तालुक्यातील हळदी येथिल उमा नदिच्या पुला जवळ दोन दुचाकीस्वारानी समोरासमोर धडक दिल्याने अपघात झाला. या अपघातात एक जण जागीच ठार तर चार जण जखमी झालेत. उत्तम बागरे असे मृतकाचे नाव आहे. तो येसगाव येथील रहिवासी आहे.
ही घटना आज दुपारी 12 वाजताचे दरम्यान घडली.


प्रमोद भोयर येरगांव येथील रहिवासी असुन शेखर कुळमेथे यांचा जवळचा मिञ दोघांनी रेगळी वरुन मुलला जाण्यासाठी निघाले. व तोतेश्वर बुराडे, इंद्रजित पिपरे, उत्तम बागरे हे हळदी वरुन येसगांव येथे जात होते दरम्यान हळदी जवळील उमा नदीच्या पुलाजवळ समोरासामोर धडक झाली.
या अपघातात. येरगाव येथिल प्रमोद भोयर, उत्तम बांगरे, रेगडी येथिल शेखर कुळमेथे, पिपरी दिक्सीत येथील इंद्रजित पिपरे, येसगाव येथिल तोतेश्वर बुरांडे, यांचा अपघात झाला.
या अपघातात सर्वानास मार असुन उत्तम बांगरे व इंद्रजीत पिपरे गंभिर जखमी आहेत.
जखमी झालेल्याना मूल येथील उपजिल्हा रुग्णालयात प्राथमिक उपचार करून चंद्रपूर जिल्हा रुग्णालयात नेत असताना उत्तम बागरे मरण पावले.
घटना स्थळावर पोलीस घटनास्थळाचा पंचनामा करून तपास सुरु केला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!