दुचाकीच्या धडकेत अंगणवाडी सेविकेचा मृत्यू

दुचाकी च्या धडकेत अंगणवाडी सेविकेचा मृत्यू.
दुचाकी चालक व त्याची आई जखमी
मिरची सातरा जवळील घटना
मॉर्निंग वाँकला गेली होती महिला


शंकरपुर (जगदीश पेंदाम)
सकाळच्या सुमारास सहा वाजता फिरायला गेलेल्या महिलेला दुचाकीने ने धडक दिल्याने तिच्या मृत्यू झाला आहे..
डोमाकडून शंकपूराकडे येत असलेल्या होंडा शाइन टुविलर धारक धीरज मालके रा. डोमा, याने शंकरपूर येतील अंगणवाडी सेविका सूर्यकांता अशोक लहाने वय वर्ष 45 या महिलेला जोरदार धडक दिल्याने तिचा मृत्यू झाला. ही महिला आपल्या सहकारी महिलांसोबत सकाळी मॉर्निंगवॉकसाठी गेली असता शंकरपूर व हिरापूरच्या मधोमध मिरची सातऱ्याजवळ तिला जोरदार धडक दिली, फिरायला गेलेल्या नागरिकांनी उपचाराकरीता प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपूर येथे आणले असता डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले असून चिमूर येथे पोस्टमार्टम करीता पााठविण्यात आले आहे तर दुचाकी वाहन चालक धीरज व त्याची आई हे जखमी झाले असून त्यांना पुढील उपचारासाठी ब्रह्मपुरी येथे हलविण्यात आले आहे. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करून कलम 279,304 (अ) अंतर्गत आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला असून पुढील तपास चौकीचे एपीआय जांभळे यांच्या मार्गदर्शनात पोलीस लोटकर हे करीत आहे.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!