तेंदूपत्ता संकलनासाठी पळसगांव ग्राम पंचायत चा विरोध
ग्राम पंचायत व कोरोना समिती ने घेतला निर्णय
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगांव (पि) : - देशासह राज्यात जिल्ह्यात सर्वत्र कोरोना संचार बंदीमुळे उद्योग व्यवसाय बंद पडले आहेत.अशातच ताडोबा बफर झोन व जंगलाला लागून असलेल्या पळसगांव (पि)ग्राम पंचायत व कोरोना समिती ने या वेळी बैठक घेऊन तेंदूपत्ता संकलन न करण्याचा निर्णय घेतला आहे.तसे पत्र त्यांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना दिले आहे.या वर्षी विरोध दर्शविला आहे, पहिलेच संचारबंदीमुळे ग्रामीण अर्थव्यव्यस्था मोडकळीस आली असताना .ग्रामीण भागातील तेंदूपत्ता संकलन हा मुख्य अर्थिक स्त्रोत होता.जर तेंदूपत्ता संकलन झाले असते तर गावात १५ लाख रुपयांचा रोजगार गावात मिळाला असता पण या वर्षी मात्र हा रोजगार हिरावला जात असून मजूर मात्र या मजुरी पासून वंचित राहणार आहेत. या वर्षी कोरोना असताना संचार बंदीमधून या व्यवसायाला सूट देण्यात आली आहे. संकलन करणारे मजूर, ठेकेदार व प्रशासनातील कर्मचारी यांनी आवश्यक कोरोनाबाबत काळजी घेवून ही प्रक्रिया राबयावची होती. प्रशासनाणे यासाठी आवश्यक वाहतूक व संकलनास विहीत पध्दतीने मंजूरी दिली असताना सुधा ग्राम पंचायत व कोरोना समितीच्या बैठकी मधून जे मजूर संस्थासत्मक विलगिकरण कक्षात आहेत त्या मजुराला तेंदूपत्ता संकलन करण्यास मनाई राहील याची विचार करून ,व गावातील भौगलीक परिस्थिती चा विचार करून हा निर्णय घेतला गेला आहे,मात्र ग्रामपंचायत नि या वर्षी रोजगार हमी योजनेतून मजुरांना रोजगार उपलब्ध करून मजुरांना मजुरी कशी मिळेल याची खबरदारी घेतली तर गावातील आर्थिक स्थिती काही प्रमाणात बरी राहील अन्यथा या वर्षी खूप बिकट संकटाला समोर जावे लागेनार आहे,या पूर्वी एकही काम रोहयो तुन झाले नसून मजुरांना हाताला काम मिळत नाही या कडे मात्र ग्राम पंचायत चे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा मात्र गावात होताना दिसत आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!