ग्रामपंचायत मारोडाचेवतीने जीवनावश्यक वस्तू वाटप
ग्राम पंचायत मारोडा च्या वतीने जनजागृती व गरीब गरजू कुटुबांना जिवनावश्यक वस्तूचें वाटप.
शशिकांत बतकमवार
देशातच नव्हे तर अख्या जगात कोरोना व्हायरसने थैमान घातले असून प्रशासनाने खबरदारीचा उपाय म्हणून देशात लॉकडाऊन व संचारबंदी सुरू केली.
ग्रांम पंचायत मारोडाच्या वतीने गावात कोरोना विषाणू बद्दल माहीती देऊन लोकांनी घरातच रहावे या करीता जनजागृती केल्या जात आहे.
संचारबंदीमुळे अनेक मजुरांचे कामे बंद असून त्यांना घरीच रहावे लागत आहे. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येवू नये या करीता मारोडा ग्राम पंचायतीचे वतीने दिनांक 9/4/2020 ला गरीब व गरजंत कुटूबीयांना जिवनावश्यक वस्तूचें वाटप करणत आले. यावेळेस प्रामुख्याने श्री. कल्लोडे संवर्ग विकास अधिकारी मुल, सौ.स्वातीताई रविन्द्र पूनकटार, सरपंच, ग्राम पंचायत मारोडा, विलास भोयर ग्रा. वि. अ. मारोडा, ताराचंद गेडाम, पो. पा. मारोडा व कर्मचारी उपस्थित होते.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!