वरोरा पोलिसांचा लॉक डाऊन रुट मार्च



वरोरा येथील संपूर्ण हद्दीत फिरुन लोकांना घरीच राहण्याचे आवाहन


वरोरा - प्रतिनिधी ( आलेख रट्टे )

वरोरा : - जगात थैमान घालणाऱ्या  कोरोनाचा प्रादुर्भाव राज्यात दिवसेंदिवस वाढत आहे. या विषाणूने अनेक बळी गेले असून कित्येकांना बाधित केले आहे. कोरोना संक्रमण वाढू नये याकरिता देशभरात २२ मार्चपासून १४ एप्रिलपर्यंत लॉकडाऊन सुरू आहे. जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण आढळून आले नसले तरी सध्यस्थिती आणीबाणीची आहे. कोरोनाची आपत्ती ओढवू पाहत आहे.  जिल्ह्यात संचारबंदीच्या काळात सुज्ञ जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असला तरी काही नागरिक मात्र त्या प्रमाणात संचारबंदी पाळत नाही, यांचा फटका इतरांना बसू शकतो. यापुढे त्याचे उल्लंघन होऊ नये तसेच प्रशासनाच्या सर्व आदेशाचे काटेकोरपणे पालन व्हावे याकरिता वरोरा पोलिसांनी बुधवारी परि. सहा पोलिस अधीक्षक यतीन देशमुख (भापोसे) यांच्या नेतृत्वात डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकातून शहरात रूट मार्च काढला. यातून पोलिसांची शिस्त अनुशासन याचे दर्शन घडले.
        कोरोना संक्रमणाची साखळी तोडून या विषाणूला हद्दपार करण्याच्या दृष्टिकोनातून राज्य व केंद्र सरकारने कठोर पावले उचलले आहे. त्याकरिता जनतेने घरातच राहावे, अत्यावश्यक कामाशिवाय घराबाहेर पडू नये. आगामी १४ एप्रिल पर्यंत येणारे सर्व सण- उत्सव प्रत्येकाने आपापल्या घरीच हर्ष उत्साहाने साजरे करावे, सोशल डिस्टन्सचे पालन करावे, टु व्हिलरचा वापर टाळावा, लहान मुले व वयोवृद्ध व्यक्ती यांची विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन पोलीस यंत्रणेमार्फत करण्यात आले. प्रशासन तसेच पोलिस यंत्रणेकडून विविध माध्यमातून जनजागृती सुरू आहे तरीसुद्धा काही लोक कोणतेही कारण नसताना रस्त्यावर उतरत आहेत, सार्वजनिक ठिकाणी गर्दी करीत आहे. त्यामुळे कोरोना संक्रमण वाढण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्यांवर केसेसही दाखल करण्यात आलेले आहे. बुधवारी  परि. सहा.पो. अधीक्षक यतीश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आंबेडकर चौक- ज्योतिबा फुले मार्ग - सावरकर चौक - डोंगरवार चौक ,- मित्र चौक - कामगार चौक, कालरी वार्ड - नेहरू चौक ते आंबेडकर चौक मार्गे रुट मार्च काढण्यात आला. काढण्यात आलेल्या रुट मार्च मध्ये सहा.पो.निरीक्षक  सोनटक्के, र मडावी,  किटे,  चवरे,  जाधव  मॅडम, पो.उप. निरीक्षक  बेलसरे आदी सहभागी ४० कर्मचाऱ्यांचा सहभाग होता.
        पोलिसांनी शिस्तबद्ध पद्धतीने रुट मार्च काढला. या रूट मार्च मध्ये सोशल डिस्टन्स दिसून आला. मार्च च्या काळात ठराविक अंतराने अधिकारी आणि कर्मचारी चालतांना दिसत होते. एकंदरीत या मार्च च्या माध्यमातून कोरोना प्रति जनतेला अधिक सजग,सावध करण्याचा वरोरा पोलिसांचा मानस होता.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!