१ लाख ५ हजार ३०० रुपयांचा अवैध मोहफुल साठा चिमूर पोलीसांनी केला जप्त



भारतात संचारबंदी सुरू असतांना सर्रासपणे मोहफुलाची दारू काढतात तरी कशी ?


जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथे दिनांक. ०९/०४/२०२० रोजी चिमूर पोलीसांना मुखबीर द्वारे माहिती मिळाली असता, इसम नामे १) प्रशांत शंभरकर रा. कवडसी (रोडी) २) देवल बांबोडे  रा. कवडसी (रोडी ) हे वेगवेगळ्या ठिकाणी कवडसी शेतशिवार जंगल परीसरात हातभट्टीची मोहफुल दारु भट्टी लावुन काढीत आहे .
अशा गोपनीय माहिती च्या आधारे पोलीस पथकासह घटनास्थळी जाऊन प्रोव्हिशन रेड केली असता एकुण मोहफुलसडवा, मोहफुलदारु, व इतर साहित्य असा एकुण १०५३००  रूपयांचा मुद्देमाल मिळुन आला व पुढील तपास चिमूर पोलीस स्टेशन करीत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!