चिमूर येथील बाजार समितीने प्रशासनाला दिली ५१ हजाराची मदत



जिल्हा - प्रतिनिधी ( विलास मोहिणकर )

चंद्रपूर : - चंद्रपूर जिल्ह्यातील चिमूर येथील कृषी उत्पन्न बाजार समिती ने जनतेला सहकार्याचा संदेश देत.कोरोनाने जगभर हाहाकार माजविला आहे. व आपल्या भारत देशात कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाने गंभीर स्थीती निर्माण झाली आहे.यासाठी सरकारने २१ दिवसाचा लॉकडाऊन सुरू ठेवला आहे.या महामारीच्या काळात आपल्या राज्यातील आरोग्य यंत्रणा दिवस व रात्र एक करीत आहेत.अशावेळी महाराष्ट्र शासन व जिल्हा प्रशासन यांनी मदत निधी देण्याचे आव्हान केले तसेच जिल्हा उपनिबंधक यांनी बाजार समिती ला परिपत्रक काढून मदत करण्याच्या सूचना केल्या त्या सूचनेनुसार चिमूर कृषी उत्पन्न बाजार समिती ने ५१०००/- रुपयांचा धनादेश चिमूर येथील सहाय्यक निबंधक यांना सुपूर्द केला हा धनादेश देत असतांना सभापती माधव बिरजे , संचालक देविदास मोहिणकर , अनिल वनमाळी , सचिव घनश्याम ढोणे उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!