कोरोना संकटातही इकबाल ठरत आहे जलदुत!

कोरोना संकटातही इकबाल ठरत आहे जलदुत!

इक्बाल काकाजी चे सर्वत्र कौतुक.

मूल (प्रकाश चलाख)

 देशात कोरोना संकट उभे असुन सर्वत्र संचारबंदी आहे. संपूर्ण देश कोरोना संकटाला तोंड देत आहे. असे असले तरी ग्रामीण भागात इतरही समस्या आवासुन उभ्या आहेत. एप्रिल महिना सुरु झाला आहे. उन्हाळ्याला सुरवात झाली असल्याने भुगर्भातील जलसाठा अाटुन ग्रामीण भागात दरवर्षी उन्हाळ्यात जलसंकट निर्माण होते. त्यामुळे जनता होरपळुन निघते तर महिलांना पाण्यासाठी कसरत करावी लागते आहे.

      मात्र अशा विदारक स्थितितही मूल तालुक्यातील २० गावांना शुद्ध पाण्याचा पुरवठा नियमीत व्हावा म्हणुन वयाची सत्तरी अोलांडलेल्या इकबाल काकाजी नावाने प्रसिध्द असलेल्या माणसाने युवकांनाही लाजवेल अशी कामगीरी करित हजारो नागरिकांना नियमित शुद्ध पाणी मिळावे म्हणुन दिवस रात्र धडपड करतांना दिसत आहे.
 
            मूल तालुक्यातील बोरचांदली व १९ गावांकरिता जिल्हा परिषदेच्या ग्रामिण पाणी पुरवठा विभागा मार्फत जिवन प्राधिकरण नळ योजना कंत्राटदारा मार्फत चालवली जाते. या योजनेचे देखभाल चे काम सध्या इकबाल करित आहेत. वयाची सत्तरी गाठली असली तरी संचार बदी असतांनाही रोज चंद्रपूर वरुन जाऊन प्रत्येक गावात नियमीत पाण्याची टाकी भरली की नाही याची खबरदारी घेतात.
            जल हे जिवन आहे.असे म्हणत या कार्यात त्यांनी स्वता:ला झोकुन दिले आहे. नल योजनेत कोठेही समस्या निर्माण झाली की ते त्वरित अधिकाऱ्यांच्या समन्वयाने सोडवत पाणी पुरवठा सुरळीत करीत आहेत.

       "या वयात नागरिकांना पाणी मिळावे म्हणुन इकबाल ची धडपड पाहुन नागरिकही सुखावले आहेत. त्याच्या या कार्याने जि.प. ग्रामिण पाणी पुरवठा विभाग हि प्रभावित असुन त्यांच्यावर कॊतुकाची छाप दिली आहे." 

        कोरोणा संकटात कार्यालयात केवळ पाच टक्के कर्मचारी उपस्थित राहत असल्याने शासकिय काम करतांना कार्यालयांना दमछाक होत आहे. अशास्थितीत ग्रामिण भागात पाणी समस्या गंभिर होत आहे. मात्र बोरचांदली , विरई, फिस्कुटी, राजगड, भेजगांव, येसगांव, सिंतळा, रेगडी, येरगांव, पिपरीक्षीत, हळदी, दहेगांव, मानकापुर, नलेश्वर, उथळपेठ, खालवसपेठ, कवळपेठ, चिचाळा, ताडाळा, चकबेंबाळ आदी गावाकरिता इकबाल जलदुत  ठरत आहे.

1 टिप्पणी:

झिंदाबाद!