नेहरू महाविद्यालय करते न्यायालयाचे अवमान विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पत्रकार विनोद शर्मा यांची नगर परिषदेला तक्रार दाखल

नेहरू महाविद्यालय करते न्यायालयाचे अवमान 
विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी पत्रकार विनोद शर्मा यांची नगर परिषदेला तक्रार दाखल


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - चिमूर चे आराध्यदैवत श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रे निमित्य नेहरू कनिष्ट महाविद्यालय चिमूर येथील प्रांगणात मीना बाजार भरविण्याची परवानगी संदर्भ प्रकरण न्यायालयात दाखल असल्याने  मीनाबाजार सुरू करण्यात येऊ नये अशी मागणी विनोद शर्मा यांनी सबधितांना तक्रारीतून केली आहे. चिमूर येथील आराध्यदैवत श्रीहरी बालाजी महाराज घोडा रथ यात्रा दि. ३० जानेवारी २०२० पासून सुरू झाली असून या यात्रे निमित्य नेहरू महाविद्यालय चिमूर येथील प्रांगणात मिनाबाजार सुरू करण्यासाठी नेहरू महाविद्यालय कडून परवानगी घेतली असली तरी या पूर्वी उपविभागीय अधिकारी कार्यालय चिमूर यांनी दि.२९ डिसेंबर २०१८ रोजी दिलेल्या आदेशात ठराव क्रमांक. ८ मध्ये स्पष्ट नमूद आहे कि शाळेतील प्रांगण फक्त विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी आहे. त्याचा वापर यात्रा किंवा व्यवसायासाठी करू नये असे असतांना मात्र हेतुपरस्पर नेहरू महाविद्यालयाच्या प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या खेळण्याच्या प्रांगणावर मीना बाजार भरविण्यासाठी १२ लाख ५१ हजार रुपये घेऊन मिनाबाजार यासाठी परवानगी दिली आहे.  या घोडा रथ यात्रेत मिनाबाजार झुले आदी मनोरंजनाच्या खेळांसाठी बालाजी देवस्थान हद्दीतील जागेची व्यवस्था करण्यात आलेली आहे. नेहरू महाविद्यालय चिमूर येथील प्रांगणात मिनाबाजार चालू करण्यासाठी बंदी असताना सुद्धा उपविभागीय कार्यालयाचे मागील आदेश धुडकवीत नवीन मीना बाजार कंत्राटदारास प्रांगण दिले आहे. या बाबत श्रीहरी बालाजी देवस्थान यांनी नेहरू महाविद्यालयाच्या विरोधात हायकोर्टात प्रकरण क्रमांक. डब्लू पी /३८६/२०२० नुसार रिच याचिका दाखल केली आहे. या यात्रे दरम्यान वर्ग १२ व्या वर्गाची परीक्षा येत असून येणाऱ्या १० दिवसांवर परीक्षा आहे. विद्यार्थ्यांच्या भविष्याचा विचार न करता परवानगी देण्यात येऊ नये व नेहरू विद्यालय चिमूर येथील प्रांगणात मिनाबाजार व झुले यांचे साहित्य खाली उतरविण्यात आले आहे. तसेच याची जोडणी करणे सुद्धा सुरू आहे.तेव्हा न्यायालयाचे अवमान होत आहे. नेहरू महाविद्यालय चिमूर येथील प्रांगणात मिनाबाजार भरविण्यास ना हरकत परवानगी देण्यात येऊ नये या संदर्भात मुख्याधिकारी नगर परिषद चिमूर व पोलीस निरिक्षक पोलीस स्टेशन चिमूर यांना निवेदन देऊन या संदर्भात मागणी पत्रकार विनोद शर्मा यांनी केली आहे .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!