चिमूर शहरात खुलेआम थर्माकॉल ला चालना देतात नगर परिषदेचे मुख्याधिकारी

चिमूर शहरात खुलेआम थर्माकॉल ला चालना देतात नगर परिषदेचे मुख्याधिकारी


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - चिमूर शहरातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात थिन व थर्माकॉल ला बंदी असून नगर परिषदेणे हेतू परस्पर छोट्या - मोठ्या दुकानदार वर्गाकडून पन्नी तसेच थर्माकॉल च्या पत्राळी व द्रोण व यांच्यावर ५००० रुपयांचा दंड ठोकून चिमूर शहरात थिन व थर्माकॉल बंदी दाखविली व दरवर्षी चिमूर शहरात फेब्रुवारी महिन्यामध्ये बालाजी महाराज घोडा रथ यात्रा उत्सव साजरा करण्यात येत असतो.
त्याचबरोबर दरवर्षी कुठल्यातरी मंदिरांच्या प्रतिकृती तयार करून भाविकांची यात्रेत गर्दी व्हावी या दृष्टिकोनातून बोलाविण्यात येत असते.

व या वर्षी सुद्धा अयोध्येतील राम मंदिर या मंदिराच्या प्रतिकृतीची तयारी मोठ्या जोमाने सुरू असून यात वापरली जाणारी मुख्य सामग्री हि थर्माकॉल आहे हि बाब नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांना माहित असून सुद्धा कारवाही करीत नसल्याने चिमूर सहरातीत छोटे - मोठे दुकानदार हे हेतू परस्पर आमच्याकडून ५००० रुपये दंड वसूल नगर परिषदेणी आमच्या कडून घेतले आहे.मग मंदिरावर कारवाही का होत नाही ? यावर प्रत्येक चौका - चौकात व दुकानदार यांच्यात चर्चा रंगली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!