चंद्रपुर गोल्ला-गोलकर समाजाचा राज्यस्तरीय ऊपवर - ऊपवधू परिचय मेळावा
चंद्रपुर येथे 9 फेब्रुवारी ला गोल्ला-गोलकर समाजाचा राज्यस्तरीय ऊपवर - ऊपवधू परिचय मेळावा तथा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन.
चंद्रपूर (प्रतिनिधी)
गोल्ला-गोलकर, गोल्लेवार-यादव समाज संपुर्ण महाराष्ट्रात तसेच आंध्रप्रदेश आणि तेलंगानामध्ये विविध ठिकाणी विखुरलेला आहे.त्यांना ऊपवधू - ऊपवर यांचा शोध घेण्यास अडचण निर्माण होऊ नये याकरिता गोल्ला-गोलकर, गोल्लेवार-यादव समाजाचा राज्यस्तरीय ऊपवधू ऊपवर परिचय मेळावा तथा सामुहिक विवाह सोहळ्याचे आयोजन रविवार दिनांक ९ फेब्रुवारी २०२० ला सकाळी ११ वाजता ऊत्सव सभागृह बायपास रोड चंद्रपुर येथे आयोजित करण्यात आला आहे, या कार्यक्रमाचे अध्यक्ष - पुरुषोत्तम कोमलवार सेवानिवृत्त नायब तहसिलदार, ऊद्दघाटक - आमदार किशोर जोरगेवार, तर प्रमुख अतिथी डाॕ. रविकिरण यादव अध्यक्ष साई वैकुंठ ट्रस्ट आदिलाबाद, नामदेवराव आयलवाड अध्यक्ष गोल्ला-गोलकर समाज महाराष्ट्र, जेष्ठ समाजसेवक क्रिष्णाजी यादव, जेष्ठ समाजसेवक मनोहर बोदलवार, जेष्ठ समाजसेवक प्रकाशजी मॕकलवार, सुनिल ऊट्टलवार, डाॕ. आऊलवार सेवानिवृत्त जिल्हा आरोग्य अधिकारी, संदेश कामटे, प्राचार्य साईनाथ आद्दर्लावार, श्रीनिवास जेल्लेवार आर.टि.ओ. चंद्रपुर, गजानन करेवाड पोलीस ऊपनिरीक्षक यवतमाळ, रतन शिलावार, मनोहर कोपुलवार, गणपत बुर्रीवार, शिलाताई मॕकलवार, चारुलता कोपुलवार, अरुणा बुर्रीवार, छाया दाऊवार, ममता शिलावार, सुनिता मॕकलवार आदि मान्यवर ऊपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाला समाजबांधवांनी सहकुटुंब ऊपस्थित राहण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष अजय मॕकलवार , जिल्हाऊपाध्यक्ष दिलीप मॕकलवार, किरण चेनमेनवार, जिल्हासचिव महेश मॕकलवार, कोषाध्यक्ष कृष्णा दाऊवार, सहसचिव शकंर मद्देलवार, श्यामराज भंडारी, संघटक प्रविण भिमनवार, महेश आगंडलवार, संजय ज्ञानबोनवार, वामन बोदलवार, श्रिष कोमलवार, सचिन येरमलवार, सुरेश मॕकलवार, सुरेश ज्ञानबोनवार, गणेश मंडलवार, दिवाकर येरमलवार, दामु भिमनवार, पंकज बुर्रीवार, बबन कोपुलवार, कल्याणी आंगडलवार, सरिता भंडारी, मनिषा मद्देलवार, ऊषा बोमनवार, विद्या बोदलवार काव्या मॕकलवार, अर्पना मेकलवार यांनी केले आहे.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!