प्रत्येक घरात शिवाजी तयार झाल्यास कुठल्याच बहिनींवर अत्याचार होणार नाही - आमदार बंटीभाऊ भांगडीया
तिरखुरा येथे शिवजयंती कार्यक्रम सोहळा संपन्न
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - प्रत्येक घरातील महिलेने जिजाबाई बनून आपल्या मुलांना शिवाजी महाराज यांचे जीवन चरित्र समजावून सांगितल्यास प्रत्येक घरात शिवाजी महाराज यांच्या विचाराने प्रेरित होऊन घरा - घरात शिवाजी तयार होईल असे झाल्यास कुठल्याच आई बहिणीवर अत्याचार होणार नाही असे प्रतिपादन चिमूर विधानसभा क्षेत्राचे लोकप्रिय आमदार किर्तीकुमार उर्फ बंटीभाऊ भांगडीया यांनी केले. चिमूर विधानसभा क्षेत्रातील तिरखुरा येथे शिवजयंती कार्यक्रमात ते बोलत होते.
आमदार बंटीभाऊ भांगडीया पुढे म्हणाले की शिवाजी महाराज यांच्या साम्राज्यात सर्व धर्म समभावना होती.प्रत्येक आई बहिणीचा आदर केल्या जात होता छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती जेवढ्या थाटामाटात आपण साजरी करतो तेवढयाच ताकतीने शिवाजी महाराज यांचे विचार घरा - घरात पोहचविण्यासाठी सहकार्य केल्यास समाजात विघातक प्रवृत्ति नष्ट होईल व समाजात शांतता राहील जाती पातीचे राजकारण संपुष्टात येऊन समाज एकरूप होईल.आमदार बंटीभाऊ पुढे म्हणाले की प्रत्येक नागरिकांनी शिवाजी महाराज यांचे विचार आत्मसात करून जीवन जगण्याचा संकल्प केल्यास तोच खरा महाराजांना मनाचा मुजरा ठरेल. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून जि.प.उपाध्यक्षा सौ.रेखाताई कारेकर, प्रमुख पाहुणे म्हणून भाजपा जेष्ठ नेते वसंतभाऊ वारजूकर, राजुभाऊ देवतळे, दिलिपजी नलोडे,सतिशभाऊ जाधव,विनोदजी चोखरे, मत्ते साहेब,विलासजी घारगे, व समस्त गावकरी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!