देवनील विद्यालय टेकडी येथे गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व संस्थेच्या उपाध्यक्षा सौ.निलीमाताई भांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्य जिल्हास्तरीय लावणी नृत्य स्पर्धा घेण्यांत आली.


देवनिल विद्यालय टेकाडी येथे गुणवंत विध्यार्थ्यांचा सत्कार
      विध्यासागर शिक्षण प्रसारक मंडळ मुल व्दारा संचालित देवनिल विद्यालय टेकाडी येथे संस्थेच्या उपाध्यक्षा सौ. निलिमाताई भांडेकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त  जिल्हास्तरीय शालेय उपक्रमाअंतर्गत लावणी नृत्य स्पर्धा आणि महाराष्ट्र राज्य माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विध्यार्थ्यांचा सत्कार कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार तथा संस्थाध्यक्ष देवरावजी भांडेकर हे होते तर उद्घाटक म्हणून  उपविभागीय पोलीस अधिकारी अनुज तारे, विशेष अतिथी  गटविकास अधिकारी कपिल  कलोडे तर अतिथी उपसभापती घनश्याम जुमनाके, गटशिक्षणाधिकारी देविदास मेश्राम, केन्द्र प्रमुख सुनील गेडाम, चावरे, प्राचार्या भावना टेकाम, प्रा. गहाणे, प्राचार्य रमेश मंडलवार, मुख्याध्यापक पेदापल्लीवार,भुषण गुरनुले, अशोक येरमे, बोरकर आदी मान्यवर उपस्थित होते. 
     या कार्यक्रमात घेण्यात आलेल्या लावणी नृत्य स्पर्धेत "अ" गटातील प्रथम अवंती दुधे, व्दितीय लोचना लोखंडे, तृतीय श्रृती दहिवले, "ब" गटातील प्रथम सुकेसिनी गेडाम, व्दितीय मिलन दळांजे, तृतीय कोमल हरडे, तसेच महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शालांत परीक्षेत गुणवत्ता प्राप्त विध्यार्थी प्रथम अनुज गोवर्धन, व्दितीय यश जमपंलवार आणि तृतीय करिष्मा गेडाम या विध्यार्थ्यांना स्मृतीचिन्ह व रोख बक्षीस  देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक राजेश सावरकर  तर संचालन गणेश श्रीरामे यांनी केले.
   कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अंबादास राजनकर, नामदेव पिजदुरकर, कृष्णदास गोवर्धन, संदीप धाबेकर, मनोहर मडावी, सुशिला उडाण, वैशाली भांडेकर, रविंद्र तुपकर, पुरुषोत्तम खोबे, आत्माराम सुरजागडे, विनोद मंगाम, आरिफ शेख आणि विध्यार्थ्यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!