मौशीखांब येथे स्नेहसंमेलनात जीवनशिक्षणाचे महत्त्व यावर मार्गदर्शन
----------------------------------------
आजच्या कोवळ्या कळ्यातून भविष्यात उद्योगरत्न होतील -- बंडोपंत बोढेकर
----------------------------------------
मौशीखांब (प्रतिनिधी )
शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ गडचिरोली द्वारा संचालित लालाजी पाटील खेवले विद्यालय मौशीखांब येथे शाळेच्या प्रागंणात वार्षिक स्नेहसंमेलनाच्या निमित्ताने राष्ट्रसंत साहित्याचे अभ्यासक ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे जीवनशिक्षणाचे महत्त्व आजची गरज या विषयावर मार्गदर्शन आयोजित केले होते .या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सुधाकर पाटील खेवले होते . उदघाटन सुप्रसिद्ध समाजसेवी व्यक्तीमत्व योगाजी सावकार बनपुरकर यांच्या हस्ते झाले. सरपंच सुधाकर गेडाम, पं.स.सदस्य शंकर नैताम, पोलिस पाटील लालाजी धोटे, देवाजी नरूले , जगदिश्वर ठाकरे , पालाल शिडाम, रमेश बानबले, ग्रा.पं. सदस्य नानाजी काळबांधे, धनराज मटकवार ,विजय हर्षे, अशोक मुनघाटे, भुषण कावळे, आदींची प्रमुख उपस्थिती होती. स्नेहसंमेलनाचे प्रयोजनाबाबत स्वागताध्यक्ष मुख्याद्यापक आर.आर.बनपुरकर यांनी प्रास्तविक केले. राष्ट्रसंताच्या ग्रामगीतेतील निवडक ओव्याचा आधार घेत विद्यार्थ्यांना सहज उमजेल अश्या अनुभव कथांचा आधार घेत बंडोपंत बोढेकर यांनी राष्ट्रसंत श्रीतुकडोजी महाराजांनी सांगितलेली जीवनमुल्ये, जीवनशिक्षणाचे महत्त्व , कला आणि व्यवसाय शिक्षणाची आजची गरज याबाबत विस्तृत मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले. ते म्हणाले , आज शालेय शिक्षण घेणाऱ्या या कोवळ्या कळ्यावर जीवन शिक्षणाचे उत्तम गुणांचे संस्कार झाल्यास भविष्यात उद्योगी ग्रामरत्न तयार होतील , असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. योगाजी बनपुरकर यांनीही मुलांच्या दृष्टीने संस्काराचे महत्त्व समजावून दिले तर सुधाकर खेवले यांनी स्नेहसंमेलनाचे विद्यार्थी जीवनात असलेले महत्त्व अधोरेखित केले. सूत्रसंचालन सी.एस.उसेंडी यांनी केले आभार प्रदर्शन एस.एच.तोडासे यांनी केले. समारोपात बंडोपंत बोढेकर यांनी आपले काव्यसंग्रह विद्यार्थ्यांना भेट दिले तर मुख्याद्यापक बनपुरकर यांना शाळेकरीता साहित्यसंच भेट स्वरूपात दिला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पी.पी.वाघरे, बावणे, धाडसे,कु.मसराम,बारसागडे,खेडेकर,दुगा,पेंदाम,झाडे आदींनी परिश्रम घेतले.




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!