गडचिरोली औ.प्र.संस्थेची चमु व्हाॕलीबाल आणि खोखो खेळात राज्य स्तरावर विजयी
गडचिरोली औ.प्र.संस्थेची चमु व्हाॕलीबाल आणि खोखो खेळात राज्य स्तरावर विजयी....
..........................................
रोख पारितोषिक देऊन खेळाडूंचा संस्थेतर्फे सन्मानित
----------------------------------------
गडचिरोली (प्रतिनिधी ) -
व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालय द्वारा आयोजित राज्य स्तरिय क्रिडा स्पर्धा औरंगाबाद औ.प्र. संस्थेत येथे घेण्यात आल्या होत्या . या स्पर्धेत शास .औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली च्या चमुनी खोखो आणि व्हाॕलीबाल खेळात मुलीच्या गटाने बाजी मारली असून राज्यस्तरीय प्रथम पारितोषिक पटकाविले आहे. संस्थेचे प्राचार्य अनंत सोमकुंवर यांनी वैयक्तिक रित्या चमुंना रोख बक्षिसे देऊन सन्मानित केले. तसेच त्यांच्या कार्याचा गुणगौरव केला. याप्रसंगी गटनिदेशक चचाणे, मधुपवार , मुरकुटे आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन संतोष बोंद्रे यांनी केले तर आभार प्रदर्शन बंडोपंत बोढेकर यांनी केले. औरंगाबाद येथे स्पर्धेचे परितोषिक प्रसंगी कौशल्य विकास मंत्री ना. नवाब मलिक , संचालक कुशवाह, सहसंचालक सतिश सुर्यवंशी , पी.टी.देवतळे आदींनी विजयाबद्दल गडचिरोली च्या चमुनां शुभेच्छा दिल्यात. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व निदेशक मंडळीनी अथक परिश्रम घेतले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!