जि. परिषद प्राथमिक शाळा सुभाष नगर मूल येथे मोठ्या उत्साहात महिला पालक मेळावा व हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
वार्ताहर
सोमेश्वर रेड्डीवार
पब्लिक पंचनामा मूल
'
*महिला पालक मेळावा "** संपन्न !
*
मूल:-जि प प्राथमिक शाळा सुभाषनगर मूल तथा महात्मा ज्योतिराव फुले कॉन्व्हेंट सुभाषनगर मूल यांच्या संयुक्त विद्यमाने
*"महिला पालक मेळावा" व "हळदी कुंकू "*
कार्यक्रम दिनांक 29/01/2020 रोज बुधवार ला आयोजित करण्यात आला, सदर कार्यक्रमाची सुरवात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले, डाँ.बाबासाहेब आंबेडकर ,राष्ट्रपिता महात्मा गांधी, यांच्या प्रतिमेचे पूजन व मालार्पण करून करण्यात आले नंतर मान्यवरांचे स्वागत व मार्गदर्शन घेण्यात आले .
या कार्यक्रमात सौ.अर्चनाताई चावरे,सौ.कल्पनाताई पुल्लावार, सौ.अर्चनाताई करकाडे,कु.सौ.हिनाताई प्रेमलवार,सौ निताताई बोर्डावार, सौ.मोनाली बोर्डावार व सर्व शिक्षक व महिला पालक यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला.
सदर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेणाऱ्या सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य ,उपस्तीत पाहुणे,पालक व उपस्तीताचे शाळेचे मुख्याध्यापक श्री खोब्रागडे सर तथा कु सारीका रेगुलवार प्राचार्य महात्मा फुले कॉन्व्हेंट मूल यांनी आभार मानले




कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!