जांभुळघाट येथील ३३ के.व्ही सबस्टेशन नविन विजेचे खांब उभारणीचे काम निकृष्ट दर्जाचे

जांभुळघाट येथील ३३ के.व्ही सबस्टेशन नविन विजेचे खांब उभारणीचे काम निकृष्ट दर्जाचे


जांभुळघाट : - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

जांभुळघाट : चिमुर तालुक्याती जांभुळघाट येथील ३३ के.व्ही.सबस्टेशन च्या नवीन विजेचे खांब उभारणाचे काम निकृष्ट दर्जाचे होत आहे. सन २०१९ ते २०२० या वर्षा मध्ये ३३ के.व्ही.सबस्टेशन काम पुर्ण झाले असुन या सबस्टेशन पासुन नविन विजेचे खांब उभारनीचे काम सुरू आहे.
सदर काम कंत्राटदार द्वारे होत असुन हे काम इस्टीमेटनुसार होत नशल्यासे दिसुन येत आहे.६ महिण्या अगोदर जे खांब उभरण्यात आले ते काही खांब पडण्याच्या तयारीत आहे.खांब उभारणीचे खड्डे हे तीन ते सव्वा तीन फुट खोल असल्या मुळे या खांबाचा टीकावा योग्य मिळत नाही.सदर चे खड्डे हे इस्टीमेट नुसार ५ फुट खोल करून सिमेंट कॉक्रेटने सदरचे खड्डे बुजवून खांब उभे करायला पाहीजे होते.
अशा प्रकारे काम हे पुर्ण तालूक्यातच होत असुन यांची पाहणी अभियांता कडे असते पण हे अधिकारी दुर्लक्ष करीत आहे. हे खांब काही दिवसात पडण्याची शक्यता नाकारता येत नाही.जर सदर खांब पडले तर त्यांचा फटका शेतकरी व गावकऱ्याना बसल्याशिवाय राहणार नाही.सदर कामाची योग्य चौकशी करून संबंधित कंत्राटदारावर योग्य कारवाही करण्यात यावी.अशी शेतकरी व गावकऱ्या कडून मागणी होत आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!