सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांचेकडून साईनाथ तलांडे यांचा सत्कार
सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांचेकडून साईनाथ तलांडे यांचा सत्कार
मूल (अमीत राऊत)
पोंभुर्णा तालुक्याच्या चेक कोसंबी येथिल साईनाथ तलांडे यांनी पाणी व्यवस्थापन समितीच्या कार्यालयाकरिता 2 हजार स्क्वेअर फूट जमिन दान दिली, यानिमित्याने आज दिदर्भ पाटबंधारे विकास महामंडळा अंतर्गत मूल येथील कन्नमवार सभागृहात घेण्यात आलेल्या कार्यक्रमात साईनाथ तलांडे यांचा नाम फॉउंडेशनचे संस्थापक तथा मराठी सिनेअभिनेते मकरंद अनासपुरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
जलसंपदा विभागाच्या असोलामेंढा प्रकल्प नूतनीकरण विभाग मूल व सावली कार्यालयाच्या वतीने विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळ नागपूर तसेच मुंबई अर्थशास्त्र व सार्वजनिक धोरण संस्था स्वायत्त मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मूल येथिल मा.सा.कन्नमवार सभागृह येथे शेतकऱ्यांसाठी पाणी वापर संस्था व सहभागी सिंचन व्यवस्थापन या विषयावर पाणी वापर संस्थाच्या पदाधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शनास्थव एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.
साईनाथ तलांडे हे चेक कोसंबी येथिल असून ते सर्वसामान्य घरातील शेतकरी आहे. सर्वसामान्य घरातील शेतकऱ्याने स्वतःची 2 हजार स्क्वेअर फूट जमिन पाणी व्यवस्थापन समितीच्या कार्यालयाकरिता जमिन दान केल्याने सर्व स्तरातून तलांडे यांचे कौतुक केल्या जात आहे. पाणी व्यवस्थापन समितीच्या सचिवपदी साईनाथ तलांडे आहे.
सत्कार करतेवेळी पाणी व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष तथा पोंभुर्णा तालुक्यातील प्रगतशील शेतकरी वसंत पोटे उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!