गणराज्य दिनानिमित्य श्रीसाई मित्र परिवारतर्फे विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले
वार्ताहर
सोमेश्वर रेड्डीवार
पब्लिक पंचनामा मूल
श्रीसाई मित्र परिवारतर्फे विध्यार्थ्यांना खाऊ वाटप
मूल शहरात झेंडा वंदनानंतर दरवर्षी प्रमाणे यावर्षी सुद्धा
राष्ट्रीय सणाला खाऊ वाटप करण्यात येते. यंदाही आपली परंपरा कायम ठेवत नित्यनेमाने राष्ट्रीय प्रजासत्ताक दिनानिमित्त श्रीसाई मित्र परिवार मूल तर्फ़े शहरातील गांधी चौकात शालेय विध्यार्थ्यांना चॉकलेट व बिस्कीट चे वाटप करण्यात आले. सोबतच यावर्षी आठवडी बाजार परिसरातील जिल्हा परिषद सुभाष नगर प्राथमिक शाळेतील विध्यार्थ्यांना सुद्धा चॉकलेट बिस्कीटचे वाटप करण्यात आले.

तसेच दरवर्षी प्रमाणे श्रीसाई मित्र परिवारच्या कार्यालयातील झेंडा वंदन सुद्धा मोठया उत्साहात साजरा करण्यात आला.
विशेष म्हणजे श्री साई मित्र परिवार हे वर्षभर विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून कार्यरत असते. राष्ट्रीय सणाला विध्यार्थ्यांना खाऊ वाटप, देशभक्तीपर कार्यक्रमात सहभाग, धार्मिक कार्यक्रम, आर्केष्ट्रा, नाटक, उन्हाळ्यात वाटसरूंना तहान भागविण्यासाठी पाणपोईची व्यवस्था, गरजुंना वेळोवेळी मदत असे विविध उपक्रमातून कार्य करीत असणारी ही संस्था मूल शहरात एक नावलौकीत मिळवीत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!