सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न.

जिल्हा परिषद हायस्कूल नांदगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन संपन्न.


मुल (प्रकाश चलाख)

 गुरुवार, दि. २३ जानेवारी.
मुल तालुक्यातील जिल्हा परिषद हायस्कूल नांदगाव येथे सांस्कृतिक कार्यक्रमाचे उद्घाटन जि. प. अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांच्या शुभहस्ते पार पडले.


 याप्रसंगी उपस्थितांना मार्गदर्शन करतांना, 'क्षेत्राच्या शैक्षणिक व सांस्कृतिक विकासासाठी प्राथमिकता देऊन मदत करणार!' असे प्रतिपादन अध्यक्षा सौ. संध्याताई गुरनुले यांनी केले.

पार पडलेल्या या कार्यक्रमाला मंचावर चंदू मारगोनवार सभापती पं. स. मुल, मंगेश मगनुरवार सरपंच नांदगाव, उमेश ईनमवार, सौ मनीषा पोटवार, बंडू नर्मलवार, विजय जाधव, बंडू मडावी, प्रशांत झाडे, नीलेश मगनुरवार, विकास शेडमाके आदी मान्यवरांसह नांदगाव हायस्कूलचे शिक्षक-विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!