मुल येथे संताजी जगनाडे महाराज जयंती उत्साहात साजरी.
मुल ( प्रकाश चलाख)
तेली समाजाचे आराध्य दैवत संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज यांची 395 वी जयंती मुल येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते संताजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन आणि दिप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान माजी आमदार देवरवजी भांडेकर साहेब ,प्रमुख अतिथी कृषि उत्पन्न बाजार समिती सभापती घनश्याम भाऊ येनुरकर ,अनिल भाऊ मोगरे ,दादाजी भाऊ येरणे,शांतारामजी कामडे, गोगुलदास कामडी सर ,विजय भुरशे सर यांनी भूषविले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविककैलास चलाख यांनी केले.आपल्या प्रास्ताविक भाषणात समाज एकता चे महत्त्व समाज बांधवांना समजावून सांगितले .
अध्यक्षीय भाषणात भांडेकर साहेबांनी सामाजिक बांधीलकी आणि समाज जागृती हीच खरी संताजी ना विनम्र अभिवादन होईल या बद्दल मार्गदर्शन केले . समाजाच्या उन्नतीसाठी व विकासासाठी समाज बांधवांनी एकत्रित होऊन लढा देण्याची गरज असल्याचे त्यांनी यावेळी भाषणातून नमूद केले.
कार्यक्रमाच्या यशस्वितेकरिता तेली समाज संताजी पुरुष बचत गटाचे अध्यक्ष कैलासजी चलाख, सचिव गंगाधर भाऊ कुनघाडकर, उपाध्यक्ष विनोद भाऊ आंबटकर तसेच बचत गटातील सर्व सदस्यानी परिश्रम घेतले.
संचालन गंगाधर भाऊ कुनघाडकर (शिक्षक) तर आभार प्रदर्शन चंदन बिलवणे सर यांनी केले. कार्यक्रमास परिसरातील तेली समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!