आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली विधानसभा. सदस्यत्वाची शपथ.
मुल (प्रकाश चलाख)
राज्याचे माजी अर्थमंत्री तथा बल्लारपूर विधानसभा क्षेत्राचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी दिनांक 10 डिसेंबर रोजी मुंबई येथील विधानभवनात विधानसभा अध्यक्ष श्री. नाना पटोले यांच्या समक्ष आमदार म्हणून शपथ घेतली.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या मुलीचा विवाह सोहळा 1 डिसेंबर रोजी नागपूर येथे संपन्न झाला. त्यामुळे ते सभागृहात शपथ घेवू शकले नव्हते. त्यामुळे त्यांनी आज विधानसभा अध्यक्षांसमक्ष विधानसभा सदस्य म्हणून शपथ घेतली.
आ. सुधीर मुनगंटीवार हे गेली सहा टर्म सलग विधानसभा सदस्य आहे. 1995 साली ते प्रथमतः विधानसभागृहाचे सदस्य झाले. 1995, 1999, 2004 या तीन टर्म मध्ये ते चंद्रपूर विधानसभा क्षेत्राचे सदस्य होते. 2009 मध्ये मतदार संघ पुनर्रचनेनंतर त्यांनी शेजारच्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून निवडणूक लढविली व विजयी झाले. 2009, 2014 आणि आता 2019 असे सलग 3 वर्षे ते बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातुन विजयी झाले.
1999 मध्ये ते काही महिने पर्यटन व ग्राहक संरक्षण विभागाचे मंत्री होते. तर गेली पाच वर्षे अर्थ, नियोजन व वन खात्याचे मंत्री म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. वनमंत्री म्हणून तीन वर्षात 50 कोटी वृक्ष लागवड करण्याचा त्यांनी केलेला संकल्प पूर्ण करण्यात आला. अर्थमंत्री म्हणून राज्याच्या विकासाला दिशा देणारे उत्तम अर्थसंकल्प त्यांनी मांडले. अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांचे ते मानकरी ठरले.
नुकताच फेम इंडिया या नियतकालीकाच्या माध्यमातुन त्यांना देशातील सर्वश्रेष्ठ अनुभवी मंत्री म्हणून त्यांना गौरविण्यात आले.
आमदार म्हणून राज्यातील दीन, दुर्बल, शोषीत, पिडीत, उपेक्षित, वंचितांच्या आयुष्यात विकासाचा प्रकाश निर्माण व्हावा यासाठी विधानसभागृहाच्या माध्यमातुन संघर्ष करू व राज्याचया विकासात योगदान देवू, असे आ. सुधीर मुनगंटीवार यावेळी म्हणाले.
आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या शपथ ग्रहणाच्यासमयी भाजपाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील, माजी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, आशीष शेलार ,विजय वडेट्टीवार, भाई गिरकर, सुजीतसिंह ठाकुर आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
"मुल बल्लारपूर विधानसभा क्षेत्रातून सलग तीन वेळा विजयाची माळ गळ्यात टाकणारे लोकनेते, विकासपुरुष यांनी मुल तालुक्याचा चेहरा - मोहरा बदलविला. अनेक लोकोपयोगी, विकास कामे त्यांनी तालुक्यात खेचून आणली. गैर बीजेपी सरकारची ही कामे तालुक्यातील जनतेने अनुभवली आहेत. परंतु नुकत्याच झालेल्या सत्ता बदलाने तालुक्याच्या विकास कामावर परिणाम होणार का? हा सर्वसामान्य जनतेला प्रश्न पडला आहे."



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!