चिमुकल्या रेहानने रुग्णांना फळवाटप करून केला वाढदिवस साजरा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा यात सहभाग
चिमुकल्या रेहानने रुग्णांना फळवाटप करून केला वाढदिवस साजरा राष्ट्रीय मानवाधिकार संघटनेचा यात सहभाग
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चिमूर येथील रेहान रहेमान शेख या विद्यार्थ्याचा वाढदिवस वडिलांनी त्यांच्या संघटनेमार्फत उप जिल्हा रुग्णालयातील रुग्णांना व मूकबधिर शाळेतील विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले .
यावेळी सुप्रसिद्ध युवा व्यापारी रहेमान शेख यांचा मुलगा रेहान शेख हा सेंट क्लॅरेट विद्यालयाचा ४ थ्या वर्गातील विद्यार्थी असून त्याच्या मनात रुग्णांची सेवा हीच ईश्वर सेवा अशी कल्पना समजून त्या मुलाने आपला वाढदिवस रुग्णांना फळवाटप करून साजरा केला. उप जिल्हा रुग्णालय चिमूर येथे रुग्णांना फळवाटप केले या
फळवाटप कार्यक्रमास राष्ट्रीय मानवाधिकार एव सामाजिक संघटना शाखा चिमूर चे सहकार्य लाभले . यावेळी राष्ट्रीय मानवाधिकार एव सामाजिक संघटन शाखा तालुका चिमूर उपाध्यक्ष प्रशांत डवले ,सचिव रुपेश जांभूळकर सहसचिव ,अब्दुल रहमान शेख कोषाध्यक्ष , नितेश सिडाम तालुका संघटन मंत्री , प्रेमदास वासनिक शहर संघटन मंत्री , गणेश सगेल , अमित मेश्राम , लीना उरकुडे , यशोदा गायकवाड , हेमलता जांभुळकर , वंदना गेडाम ,रोहिणी गेडाम, छाया सहारे , वनिता सोरदे , रवींद्र टापरे व आदी यावेळी उपस्थित होते.





कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!