बीएसएनएल सेवेअभावी ग्राहक त्रस्त! बीएसएनएल ने दर्जेदार सेवा देण्याची जनतेची मागणी.

बीएसएनएल सेवेअभावी ग्राहक त्रस्त!

 बीएसएनएल ने  दर्जेदार सेवा देण्याची जनतेची मागणी.

  मुल( प्रकाश चलाख)

भारतीयदूरसंचारकंपनी(बीएसएनएल) ची सेवा तालुक्यात कोलमडली असून याचा नाहक त्रास विद्यार्थी तसेच नागरिकांना होतं असल्याने   बीएसएन एल ने सेवा दर्जेदार द्यावी अशी मागणी तालुक्यातील बीएसएनएल ग्राहक, विद्यार्थी तसेच नागरिकांनी केली आहे.


 सध्या डिजिटल युग आहे. सर्व कामे डिजिटल झाल्याने घराघरात सामान्य नागरिककाजवळ स्मार्टफोन आहेत. सर्व कामे ऑनलाइन होत असल्याने डिजिटल युगात सगळ्यांना अपडेट राहणे जरुरी झाले आहे. सर्व संगणकीय कामे, मोबाईल वरील कामे करीत असताना नेटवर्क जरुरी आहे. जर नेटवर्क नसेल तर त्याचा थेट फटका अनेक महत्वपूर्ण कामावर होतो. आणि अशा वेळेस तालुका तसेच ग्रामीण भागात उपलब्ध असलेली बीएसएनएलची सेवा पोहोचत नसेल तर मनस्ताप सहन करावा लागतो.

 सध्या भारतात   सेवा देणाऱ्या कंपन्यांचा सुळसुळाट झाला असून कंपन्या मध्येच स्पर्धा ,चुरस निर्माण झाली आहे. अनेक कंपन्या ग्राहकांना आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी अनेक ऑफर्स  देऊन सेवा घेण्यासाठी  बाध्य करीत असतात.

 मुल तालुक्यात बीएसएनएल चे बरेच ग्राहक असून बीएसएनएलच्या सेवेमुळे त्रस्त झाले आहेत . ग्राहकांनी बीएसएनएलच्या सेवेबाबत वरिष्ठांकडे तक्रार करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सेवे बाबत कसलीही सुधारणा होत नसल्याने  बीएसएनएल च्या कार्यप्रणालीवर तालुक्यात संताप व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक  तसेच ग्रामीण भागात नेटवर्क चा  अभाव असल्याने अनेक महत्त्वपूर्ण कामे, संभाषण डिजिटल युगात करीत असताना बीएसएनएल ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.

 तरी वरिष्ठ पातळीवरून या प्रकरणाची योग्य ती दखल घेऊन  तालुक्यातील बीएसएनएल ग्राहकांना  दर्जेदार सेवा बहाल करावी  अशी विनंती तालुक्यातील विद्यार्थी व  नागरिकांनी केली आहे.

 "मूल तालुक्यातील ग्रामीण भागात बीएसएनएल व्यतिरिक्त इतर मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क आहे. बीएसएनएल चे नेटवर्क फार कमी आहे. बि एस एन एल वर संभाषण, कामे करीत असताना अनेक अडचणी येत असतात. त्यामुळे ही अडचण दूर करून  संपूर्ण मूल तालुक्यात बीएसएनएल ने इतर कंपन्या सारखी दर्जेदार सेवा ग्राहकांना प्रदान करावी."

                     श्री कोमदेव बुरांडे 
               कृषी मित्र, सिंतळा ता. मुल.
 
Show quoted text
Show quoted text

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!