हैद्राबाद येथील बलात्काराचा विषय घेऊन सम्यक विद्यार्थी संघटने तर्फे आंदोलन करून चिमुर शहरात केला निषेध - उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतीनां पाठविले निवेदन

हैद्राबाद येथील बलात्काराचा विषय घेऊन सम्यक विद्यार्थी संघटने तर्फे आंदोलन करून चिमुर शहरात केला निषेध
- उपविभागीय अधिकारी यांच्या मार्फत राष्ट्रपतीनां पाठविले निवेदन


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर :- देशात महिलांवर होणाऱ्या अत्याचाराचे प्रमाण अधिकाधिक वाढले असून,त्यांच्या सुरक्षेबाबत शासन कमकुवतपणे निर्णय घेत असून, तेलंगणा राज्याची राजधानी हैदराबाद येथे पशु वैधकीय महिला डाँक्टर यांच्यावर अत्याचार करून जिवंत जाळले. अशा प्रकारची घटना मानवी जीवनाला काळिमा फासणारी असून जे कृत्य त्या ठिकाणी झाले त्या संपूर्ण घटनेचा निषेध ,सर्वच राज्यातून करण्यात आला आहे.  देशात महिला सुरक्षित नसून, प्रत्येक दिवसाला कोणत्या ना कोणत्या मुलीला बलात्काराचा बळी व्हावं लागतं. असे देशात नेहमी चालत असून भारतातील शासन बेजवाबदार पणाने का वागत आहे ? असल्या भक्षकांन पासून महिलांचा बचाव व्हायला पाहिजे या करिता हैद्राबाद येथील दोषींना फाशीची शिक्षा देण्यात यावी व महिलांकरिता केलेल्या कायदयांची योग्य अमलबजावणी करून तिला न्याय मिळावा या करिता चिमूर येथे आज दिनांक ०५/१२/२०१९  ला उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे चिमूर तालुका अध्यक्ष शुभम मंडपे, संघटक निखिल रामटेके,संघर्ष मेश्राम,प्रशांत रामटेके,विशाल दडमल,सुमित मेश्राम,चंद्रशेखर नन्नावरे, मयूर मेश्राम, रोहित रामटेके व आदी संघटनेचे सदस्य यावेळी उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!