चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई चे बांधकाम अतिशय कासव गतीने सुरू

चिमूर वरोरा राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई चे बांधकाम अतिशय कासव गतीने सुरू


अनेकांना गमवावे लागले जीव

चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )

चिमूर : - चिमूर ते वरोरा जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ३५३ ई चे काम हे २ वर्षांहुन अधिक
अतिशय कासव गतीने सुरू असून या कासव गतीच्या कामामुळे अनेकांना धुरामुळे व खड्यांमुळे तसेच महामार्गाच्या ठेकेदारांनी अटी शर्ती चा पालन न करता रिबीन तसेच रेडिअम व
दिशादर्शक  फलक व सिम्बॉल न लावल्याने प्राण गमवावे लागले आहे.आजही तिच परिस्थिती असून यावर आढा घालता यावा म्हणून चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कुणाल खेमणार यांनी याची दखल घेत पोलिसांच्या माध्यमातून व वाहतुकीवर नियंत्रण राहावे म्हणून समिती तयार केली . व यामुळे महामार्गाच्या कामास गती प्राप्त न झाल्याने ठेकेदारांवर १००००० /- रुपये दंड अशी  शिक्षा देण्यात येणार अशी माहिती दिली . व काम जलद गतीने महामार्गाचे व्हावे अशी आशंका जनतेकडून वर्तविली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!