चिमूर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य स्तरीय वैचारिक अभिवादन स्पर्धा
चिमूर येथे महापरिनिर्वाण दिनानिमित्त राज्य स्तरीय वैचारिक अभिवादन स्पर्धा
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - दिनांक.०५/१२/२०१९ डॉ.बाबासाहेब आंबेडकर नॅशनल असोसिएशन ऑफ इंजिनिअर शाखा नागपूर द्वरा राज्य स्तरीय अभिवादन स्पर्धा परीक्षा उदयाला दिनांक. ०६/१२/२०१९ ला मौजा चिमूर तालुक्यातील ग्रामीण भागातील शाळेतील परीक्षार्थींना या स्पर्धा परीक्षेत १०१ परीक्षार्थीं बसले असून या मध्ये प्रथम क्रं,१ लाख रु.रोख व प्रमाणपत्र,व दुसऱ्या नंबरला ५० हजार रु.तिसरे बक्षीस ३५ हजार,चवथे बक्षिस २५ हजार रु.पाचवे बक्षीस २० हजार व इतर बक्षिस देण्यात येणार असून या परिक्षे करीता न्यू राष्टीय विद्यालय चिमूर येथून ६३ परिक्षार्थी ,नेहरू विद्यालय ३१ परीक्षार्थी,पांडुरंग दहिकर विद्यालय तळोधी नाईक येथून१७ परीक्षार्थी परीक्षेला बसले आहेत.
सदर परीक्षेच्या मद्यमातून महापुरुषयांनी केलेल्या राष्टीय कार्याबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी,त्यांना नियमित अभ्यासाची सवय लागावी,आपले अधिकार,जबादारी व कर्तव्य याची जाणीव होण्याचा दृष्टिकोनातून सदर स्पर्धा आयोजित केल्या असून असल्या स्पर्धे मधून भविष्यात स्पर्धा परीक्षेत याचा निश्चित लाभ मिळावा या हेतूने ही स्पर्धा आयोजित केली आहे,या कामी,न्यू राष्टीय विद्यालय,मुख्याध्यापक किशोर खोब्रागडे, पठाण सर,सुनील खोब्रागडे, तुषार शंभरकर,सुनील चौधरी सर ,नेहरू विद्यालय चिमूर मुख्याध्यापक सहारे सर,रामटेके सर,धारने सर,दहिकर विद्यालय तळोधी ना,विलास शंभरकर सर,मोहन दोडके,प्रफुल येसम्बरे, विकास अंबादे,यांनी सहकार्य केले असून सहकार्य बद्दल स्थानिक समन्ययक,शालीकजी थुल, यानि सहकार्याबद्दल आभार मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!