चिमुर तालूक्यात दारूचा महापूर

चिमुर तालूक्यात दारूचा महापूर


जिल्हा दारु बंदी ची थट्टा

जांभुळघाट - प्रतीनिधी ( केवलसिंग जुनी )

जांभुळघाट : - १ एप्रिल २०१५ चंद्रपुर जिल्हा दारू बंदी  च्या नावाने मागील पाच वर्षा पासुन ओळखला जात आहे.पण ही ओळख नावापुर्तीच असल्याचे दिसुन येते .संपुर्ण चंद्रपूर जिल्यातच दारू ची विक्री मोठ्या प्रमाणात सुरु असल्याचे दिसुन येत आहे.त्यात चिमुर तालूक्यात दारूचा महापुर सुरु असल्याचे दिसुन येत आहे.चिमुर तालुक्यात दारूचा पुरवठा चारही दिशेने होत आहे.वरोरा,हिंगणघाट ,नांद, उमरेड, भिवापुर,पवणी व ब्रम्हपुरी या मार्गाने जास्त करुन दारू डिलर मोठ्या प्रमाणात दारू पुरवठा करीत आहे. तर चिमुर तालुक्यात भिसी,परीसरात, नागपुर,उमरेड,नांद व मालेवाडा चे डिलर आहे. शंकरपुर परीसरात,शंकरपुर,कांपा, पिंपळगाव येथील डिलर, तर नेरी,परीसरात, मोटेगाव डिलर, व चिमुर परीसरात ब्रम्हपुरी, हिंगणघाट,नांद,येथील डिलर आहे,तर खडसंगी,परीसरात नांद,मुरपार,हिंगणघाट,कोरा, येथील डिलर असल्याचे दिसुन येतात.हे सर्व डिलर चिमुर परीसरात दारूचा पुरवठा करीत असतात.यांना पोलीस प्रशासनाचा पाठबळ मिळत असते.व या दारु  पुरवठा करीत असलेल्या आरोपींवर बरेचशे  गुन्हे दाखल असुन सुध्दा  दारू चा पुरवठा सुरूच असते.यांच्यावर गुन्हे असतात पण यांना  पोलीस प्रशासन अटक करीत नाही. फरार म्हणून दाखवित असतात.व हे डिलर बिनधास्तपणे दारु  पुरवठा करीत असतात .चंद्रपुर जिल्यात दारू बंदीची एक प्रकारे थट्टाच होत आहे.जिल्हयात सामान्य जनते मध्ये चर्चा सुरु आहे,ती म्हणजे एक तर पुर्ण पणे दारू बंदी करावी किवा जिल्हा दारू बंदी उठवावी अशा प्रकारची मागणी जनतेमध्ये जोर पकडू राहीली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!