जनगणना 2021 ओबीसी विरोधी.
जनगणना 2021 ओबीसी विरोधी.
हक्कासाठी 3 डिसेंबर 2019 ला सहभागी होण्याचे आवाहन.
मूल( प्रकाश चलाख)
देशात सर्वत्र ओबीसी आरक्षणावर आंदोलन सुरू असताना सरकारने 2021 जनगणना करण्याचा कार्यक्रम जाहीर करीत तशी प्रक्रिया सुरू केली आहे. याचा निषेध म्हणून देशभर ओबीसी प्रवर्गातर्फे तीन डिसेंबरला निषेध कार्यक्रम आयोजित केलेला आहे. कार्यक्रमात सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ तेली समाज महासंघातर्फे करण्यात आले आहे.
यात जनगणना रेखा नमुना अर्जामध्ये इतर मागास वर्गीय प्रवर्गाचा उल्लेख नसल्याने इतर मागास वर्गीय समाजाचे संविधानिक अधिकाराचे हणन होत असल्या कारणामुळे सरकारने 2021 जनगणना करायला हवी. जेणेकरून आपल्या भारतीय राज्यघटनेच्या कलम 340 व जनगणना कायद्यानुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, बांधवासोबत मागास वर्गीय ओबीसी, व्हीजे,एनटी, डीएनटी, व एसबीसी याचीसुद्धा जनगणना अपेक्षित आहे.
जेणेकरून जाती टक्के वारी नुसार सरकारने आरक्षण द्यावयास पाहिजे.
सरकारने ओबीसीची स्वतंत्र जनगणना वगळल्याने जनगणना 2021 ला ओबीसी समाजातर्फे उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले आहे.
तरी सरकारने ओबीसीभावनांचा आदर करून 2021 ओबीसीची स्वतंत्र जनगणना करायला हवी. आणि सरकार हे करायला विलंब करीत असेल तर सर्वपक्षीय ओबीसी खासदार,आमदार, लोकप्रतिनिधी त्यांना ओबीसीच्या हक्काची जाणीव करून द्यायला हवी.
ओबीसी जनगणना हा ओबीसी समाजाचा जन्मसिद्ध राज्यघटनेने दिलेला अधिकार आहे. तरी सर्व ओबीसी बांधवांनी जागे होऊन जनगणना 2021 कार्यक्रमा विरोधात सरकार च्या कुटील डावाचा 3 डिसेंबर 2021 ला पूर्ण देशभर निषेध कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आयोजित कार्यक्रमात सर्व समाज बांधवांनी सहभागी होण्याचे आवाहन विदर्भ तेली महासंघातर्फे करण्यात आले आहे.
श्री. कैलास चलाख.
जिल्हा संघटक,विदर्भ तेली समाज महासंघ मुल.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!