पोलीस स्टेशन चिमूर ला पब्लिक मीटिंग संपन्न
चिमूर : - दिनांक.०२/१२/२०१९ ला चिमूर पोलीस स्टेशन येथे आयजी मल्लिकार्जुन प्रसन्ना यांच्या प्रमुख उपस्थितीत पब्लिक मिटिंग संपन्न झाली.
यावेळी जिल्हा पोलिस अधिक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, ठाणेदार स्वप्निल धुळे उपस्थित होते.या पब्लिक मीटिंग मध्ये चिमूर शहरामध्ये सुरू असलेली दारू विक्री ,अवैध वाहतूक स्थळ संदर्भात प्रश्न उपस्थित करण्यात आले.तेव्हा आयजी प्रसन्ना यांनी या समस्या सोडवण्यासाठी जनतेचे सहकार्य लागत असून त्यावर कारवाई करण्याचे आश्वासन दिले .

येत्या २६ जानेवारी ला चिमूर पोलीस स्टेशन मध्ये कौटुंबिक सल्ला मार्गदर्शन केंद्र सुरू होणार असल्याचे सुद्धा यावेळी सांगण्यात आले.महिला सुरक्षा समितीच्या सुमनताई पिंपळापुरे , लताताई अगडे , गीता लिंगायत नगराध्यक्ष गोपाल झाडे , नगरसेवक अब्दुल कदिर शेख ,नगरसेवक सतीश जाधव, प्रदीप बंडे , सचिन फरकाडे योगेश ठुने ,पत्रकार गणपत खोबरे , कलिम शेख , रामदास हेमके , रामदास ठुसे , पपू शेख सहित शहरातील प्रतिष्टीत नागरिक पुरुष व महिला वर्ग या कार्यक्रमाला उपस्थित होते .

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!