झाडीबोली साहित्य संमेलनाध्यक्षपदी भंडाराचे डाॕ. गुरूप्रसाद पाखमोडे
झाडीबोली साहित्य संमेलनाध्यक्षपदी भंडाराचे डाॕ. गुरूप्रसाद पाखमोडे
२८ व २९ डिसेंबरला मौशीखांब येथे संमेलन आयोजित
चंद्रपूर (प्रतिनिधी)
झाडीबोली साहित्य मंडळ केंद्रीय समितीचे२७ वे झाडीबोली साहित्य संमेलन यावर्षी गडचिरोली येथून जवळच असलेल्या मौशीखांब या ऐतिहासिक गावी येत्या २८ व २९ डिसेंबर ला आयोजित केलेले आहे. झाडीबोली साहित्य मंडळ आणि मौशीखांब ग्रामस्थ यांच्या संयुक्तपणे या संमेलनाचे आयोजन होत आहे.
केंद्रीय समितीच्या वतीने संमेलनाध्यक्ष म्हणून भंडारा येथील ज्येष्ठ साहित्यिक डाॕ. गुरूप्रसाद पाखमोडे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. डाॕ. पाखमोडे यांनी संत एकनाथ महाराजांच्या अभंगगाथेचा चिकित्सक अभ्यास या विषयावर आचार्य पदवी मिळविली असून युजीसी पुरस्कृत संशोधन प्रकल्पात भंडारा जिल्हातील लोकसाहित्य, सर्वेक्षण आणि अभ्यास या विषयावर लेखन केलेले आहे. त्यांच्या मार्गदर्शनात आजवर १५ संशोधकानी आचार्य पदवी प्राप्त केलेली आहे. सुरूवातीला ते समर्थ महाविद्यालय भंडारा येथे मराठी विभाग प्रमुख होते. प्रगती महिला महाविद्यालयातून प्राचार्य म्हणून ते सेवानिवृत्त झालेले आहे. संत साहित्य आणि लोकसाहित्य यावर त्यांनी विपुल लेखन केले असून झाडीबोली साहित्य मंडळाचे उपाध्यक्ष म्हणून उत्तम सेवा दिलेली आहे.
केंद्रीय समितीचे अध्यक्ष डाॕ. हरिश्चंद्र बोरकर, डाँ. राजन जयस्वाल, ना. गो. थुटे, हिरामण लांजे, लखनसिंह कटरे, सौ. अंजनाबाई खूणे, ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर, मिलींद रंगारी, राम महाजन तसेच सर्व कार्यकारीणी सदस्यांनी डाॕ. पाखमोडे यांचे अभिनंदन केले आहे. संमेलन स्थळास मेघनाथ साहित्य नगरी नांव देण्यासंबधी निश्चित करण्यात आलेले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!