शिवाणी माध्यमिक विद्यालय पळसगांव मधे सिकलसेल मार्गदर्शन शिबिर संम्पन

शिवाणी माध्यमिक विद्यालय पळसगांव मधे सिकलसेल मार्गदर्शन शिबिर संम्पन


श्री साई सिकलसेल बहुऊदेशिय संघटनेचा उपक्रम

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - देशभरात दरवर्षी आयोजित होत असलेल्या ११ डिसेबर ते १७ डिसेबर सिकलसेल आठवडा राबविण्यात येतो .त्याच निमित्ताने चंद्रपूर जिल्ह्यात श्री.साई सिकलसेल बहुउद्देशीय संस्थेने पुढाकार घेत आज दिनांक.१३/१२/२०१९ रोजी दुपारी ०२:०० वाजता शिवानी माध्यमिक विद्यालय पळसगांव इथे विधार्थ्यांसाठी सिकलसेल  मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित केलेला होता.त्यानिमित्ताने कार्यक्रमाचे  अध्यक्षस्थानी मा,चुनारकर सर मुख्याद्यापक , होते. तसेच कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून श्री साई सिकलसेल बहुउद्देशीय संस्था संस्थापक अध्यक्ष प्रा. विजय निरंजने होते .त्यासोबतच कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून एडव्होकेट मेश्राम मैडम, विरेंद्र मेश्राम, हेमंत सूर्यवंशी, प्रमोद अलोने, श्रीहरी सातपुते, दयाराम जांभूलें भाष्कर बावनकर, इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
                प्रमुख पाहुन्यानच्या हस्ते महापुरुषच्या प्रतिमेला दिप प्रज्वलन करण्यात आले,  उपस्थित मान्यवरांचे गुच्छ देहून स्वागत करण्यात आले, श्री साई सिकलसेल बहुउद्देशीय संस्थाचे अध्यक्ष प्रा, विजय निरंजने यानी विधार्थयन सिकलसेल आजरबाबत मार्गदर्शन केले व सिकलसेल बाबत भीति न बाळगता सिकसेल बाबत माहिती घेऊन आपन नागरिकांना सिकलसेल बद्दल जागृत करा असे आव्हान प्रा, विजय निरंजने यानी यावेळी केले.
             कार्यक्रमाचे संचालन बन्सोड सर   तर आभार प्रदर्शन तागडे सर यानी केले, सदर कार्यक्रमास या मगरे सर,एनचलवार,मसूद शेख,सुरवांशी हरीचंद्र झोडे,फारुख शेख आदि सहका-यांनी कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!