अजुनही मुलभुत अधिकारापासुन बहुजन वंचितच - पुष्पाताई बौद्ध

अजुनही मुलभुत अधिकारापासुन बहुजन वंचितच - पुष्पाताई बौद्ध


- संविधान सन्मान दिन समारोह संपन्न 

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - संविधान सन्मानाकरीता संघटनात्मक प्रयत्न करणे आवश्यक असुन त्यासाठी भाषणापेक्षा कृती करावी लागेल . सगळ्यांना एकत्र येऊन सामाजीक आचरण , सामाजीक बांधीलकी जपुन विषमता मिटवावी लागेल . प्रतीवादांच्या मुस्कटदाबीमुळे बहुजन विस्कटलेला असल्यामूळे अजुनही मुलभुत अधिकारापासुन बहुजन वंचितच राहीलेले आहेत . अशी खंत चिमूर येथील संविधान सन्मान दिन समारोह प्रसंगी वामनदादा कर्डक विचारमंच वरून मार्गदर्शन करताना राष्ट्रिय पारिवारीक धम्म संगोष्ठी बौद्ध महिला मैत्री संघाच्या आयोजिका पुष्पाताई बौद्ध यांनी व्यक्त केली .
         वडाळा(पैकु) , चिमूर येथे ७० व्या संविधान सन्मान दिन समारोहाचे आयोजन मंगळवारला बिपीएड ग्राउंड येथे करण्यात आले होते . संविधान सन्मान दिन कार्यक्रमात वामनदादा कर्डक विचार मंचावर कार्यक्रमाचे अध्यक्ष गोंडपींपरीचे केंद्र प्रमूख अविनाश शंभरकर, प्रमूख मार्गदर्शक पुष्पाताई बौद्ध , माजी प्राचार्य एस .एन .पठाण , आंबेडकरी विचारवंत तथा सामाजीक कार्यकर्ता राजु झोडे , कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष चुन्नीलाल कुडवे, सत्कार मूर्ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य कार्तिक पाटील , जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त महेंद्र लोखंडे आदी उपस्थीत होते.
         भारतिय संविधान व धम्माची सांगड  या विषयावर विचार व्यक्त करताना  पुष्पाताई बौद्ध म्हणाल्या की भारतिय प्रत्येक समाज घटकांच्या विकासाची पुंजी असलेला भारनिय संविधान म्हणजेच धम्म होय . संविधानातिल मूलभुत अधिकार व कर्तव्याच्या पालणा करीता संविधानाची आणी धम्माची सांगड घालावी लागेल या प्रंसगी डॉ .आंबेडकरांचे सामाजीक कार्य व भारतिय संविधान यांचा सहसंबध या विषयावर बोलताना माजी प्राचार्य एस .एन . पठाण म्हणाले की भारतिय संविधान हे डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला दिलेल्या बहुमोल बक्षीस आहे ज्यामूळे देश महासत्ता बनण्याकरीता अग्रेसर आहे . भारतिय संविधान -भारताचा राष्ट्रगंथ या विषयावर बोलताना सामाजीक कार्यकर्ते राजु झोडे म्हणाले की मनुवांद्यांनी जाती जातीत धर्मा धर्मात उभी केलेली भिंत आपल्याल्या भारतिय संविधानानी दिलेल्या अधिकाराने पाडायची आहे .
          कार्यक्रमादरम्यान राष्ट्रसंत तुकडोजी महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ . कार्तिक पाटील व जिल्हा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त महेंद्र लोंखडे यांचा सत्कार करण्यात आला . कार्यक्रमा दरम्यान संविधानावर व रमाई वर सुंदर गित जयश्री लोखंडे यांनी सादर केले. प्रास्ताविक महेंद्र लोखंडे , संचालन रसीका झिलेटे व विनोद गेडाम यांनी केले तर आभार  राजकुमार गेडाम यांनी केले . संविधान सन्मान समारोह प्रंसगी संध्याकिरण व संच यांचे भिम गिताचा कार्यक्रम व  सांयकाळी शहरातील मूख्य मार्गावरूण बाईक रॅली काढण्यात आली कार्यक्रमाला तालुक्यातील मोठया प्रमाणात संविधान प्रेमी महिला , पुरुष व तरूण उपस्थीत होते. कार्यक्रमाला विशेष सहकार्य पुंडलीक पाटील, दिपक डोगंरे, किशोर नागदेवते, नंदणवार, डॉ संदीप मेश्राम, भैसारे गुरूजी यांनी सहकार्य केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!