रोशनी सातपुते यांच्या स्मूर्ती प्रित्यर्थ रक्तदान शिबिर संपन्न

रोशनी सातपुते यांच्या स्मूर्ती प्रित्यर्थ रक्तदान शिबिर संपन्न


जय संतोषी माँ ग्रुपचा उपक्रम

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - चिमूर येथील श्रीहरी बालाजी देवस्थान येथे जय संतोषी माँ ग्रुप चिमूर व डाँ हेडगेवार रक्तपेंढी नागपूर च्या वतीने रोशनी सातपुते स्मूर्ती प्रित्यर्थ भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.यात शिबिरात शहरातील 71 रक्तदात्यांनी रक्तदान केलं.

 सद्यस्थितीत  विविध आजारांमुळे  रक्तपेठ्यात रक्ताचा मोठा तुटवडा निर्माण झाला असल्याने व रक्तदाता पेक्षा 25% रक्ताची मागणी जास्त असल्यामुळे  ही बाब लक्षात घेऊन रोशनी सातपुते स्मूर्ती दिनाच्या निमित्ताने जय संतोषी माँ ग्रुप च्या वतीने स्थानिक श्रीहरी बालाजी देवस्थान मध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आल होत यात शहरातील 71 रक्तदात्यांनी स्वयंपूर्तीने सहभाग घेत रक्तदान केलं.
                   कार्यक्रमाचे दीप प्रजवलन चिमूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी मंगेश खवले, चिमूर तहसिलचे तहसीलदार संजय नागतीलक यांनी केले, यावेळी महाराष्ट्र प्रांतिकचे कार्याध्यक्ष धनराज मुंगले, नगरसेवक उमेश हिंगे मनोज हजारे रामदास कामडी उपस्थित होते, रक्तदात्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व बॅग देण्यात आले.
      या शिबिराच्या यशस्वीतेसाठी जय संतोषी माँ ग्रुप, नवयुवक जय श्रीराम भजन मंडळ, श्रीहरी बाल विकास गणेश मंडळ व गाडगे बाबा पुण्यतिथी उत्सव समितीचे श्रीहरी सातपुते, गुणवंता चटपकार सारंग भट, प्रकाश सातपुते, राजू मेश्राम, रवी सातपुते, लखन चटपकार, अंकुश जुमडे, सागर पायलीमोडे, पंकज सातपुते, सौरभ बडगे, रवी बावनकर, वृषभ सातपुते, पराग लांबे, सोनू कावरे, कृष्णा दडमल, अमर वांढरे, रागिणी सातपुते, आचल डांगे आदींनी परिश्रम घेतले.
  
तहसीलदार नागटिळक यांनी केले रक्तदान
    
    चिमूर येथील तहसिल कार्यालयचे तहसीलदार संजय नागतीळक यांनी आपल्या व्यस्त कामातून रक्तदान शिबिरात सहभागी होऊन रक्तदान केलं.  एकीकडे नागरिकांत रक्तदानाविषयी  नागरिकांत गैरसमज असल्याने नागरिक रक्तदान करण्यास घाबरत असतात.मात्र संजय नागतीळक यांनी रक्तदान करून रक्तदात्यांचा उत्साह वाढविला, तसेच मुख्यधिकारी मंगेश खवले यांनी रक्तदान करणाऱ्या कर्मचाऱ्यांना अर्ध्या दिवसाची रजा मंजूर केली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!