अभूतपूर्व तुफान मिरवणुकीने किर्तीकुमार भांगडीया यांनी सादर केला उमेदवारी अर्ज जोरदार शक्तिप्रदर्शन १५ हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती
अभूतपूर्व तुफान मिरवणुकीने किर्तीकुमार भांगडीया यांनी सादर केला उमेदवारी अर्ज
जोरदार शक्तिप्रदर्शन १५ हजार कार्यकर्त्यांची उपस्थिती
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - दिनांक.०४/१०/२०१९ चिमूर विधानसभा क्षेत्राचे विद्यमान आमदार आणि भाजप सेना रासप व रिपाई महायुतीचे उमेदवार किर्तीकुमार भांगडिया यांनी आज अभूतपूर्व अशा तुफान गर्दीच्या रॅलीने चिमूर मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश संकपाळ यांचेकडे उमेदवारी अर्ज सादर केला.
यावेळी चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, माजी आमदार मितेश भांगडिया, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कृष्णा सहारे, जि.प.सदस्य संजय गजपुरे, वसंत वारजूकर, जुनेदखान शिवसेनेचे धर्मसिंग वर्मा, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ. शामाजी हटवादे, डॉ. वैभव बियाणी नीलम राचलवार होमदेव मेश्राम सचिन आकुलवार आवेश पठाण कैलास धनोरे मनिष तुम्प्लिवार आदी उमेदवारी अर्ज सादर करीत असताना उपस्थित होते.
उमेदवारी अर्ज सादर करण्यापूर्वी किर्तीकुमार भांगडिया यांनी येथील प्रसिध्द बालाजी मंदिरात जाऊन दर्शन घेतले.
तत्पूर्वी नेहरू विद्यालय येथे संबोधित करतांना आमदार किर्तीकुमार भांगडिया म्हणाले की, पक्ष पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेच्या आशीर्वादाने या मतदार संघाची सेवा करण्याची संधी मिळाली, गेल्या ५ वर्षाच्या काळात मतदार संघातील असंख्य विकासकामे मार्गी लावली असून अनेक कामे प्रगती पथावर आहेत.
येना-या काळात उर्वरित सर्व कामे पूर्ण करायची असून त्याकरताच पक्षाने विश्वास दाखवीत पुन्हा त्यांना उमेदवारी दिली.
त्याबद्दल पक्षाचे आभार, ही विकासाची लढाई असून या लढाईत आम्ही भरघोस मतांनी जिंकून क्रांती होईल, इतिहास घडेल.
महाराष्ट्रात मा. देवेंद्रजी फडणवीस यांचे नेतृत्वात पुन्हा भाजप सरकार येईल. असा आशावाद व्यक्त करीत उर्वरित कामे पूर्ण करणार असल्याची ग्वाही दिली.
विधमान आमदार तथा उमेदवार किर्तीकुमार भांगडीया सजवलेल्या बैलजोडी वर उभे राहून जनतेचा आशीर्वाद घेत होते.

नेहरू विद्यालय येथून निघालेल्या मिरवणुकीत अफाट गर्दी लोटली संदल वाद्य गजरात व घोषणेच्या निनादात मिरवणूक
उपविभागीय अधिकारी कार्यालय कडे निघाली
नागरिक स्वयंस्फूर्तीने या मिरवणुकीत सहभागी झाले होते. एक किलोमीटर पेक्षा अधिक लांब असलेल्या मिरवणुकीत नगराध्यक्ष ,नगरसेवक जि.प. सदस्य पं.स सदस्य कृउबास संचालक व चिमूर विधानसभा क्षेत्रातील असंख्य नागरिक व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!