चिमूर विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करून वंचित बहुजन आघाडी ने केले नामांकन दाखल

चिमूर विधानसभा निवडणुकीमध्ये जोरदार शक्ती प्रदर्शन करून वंचित बहुजन आघाडी ने केले नामांकन दाखल 


पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुक २०१९ प्रक्रीयेअंतर्गत,चिमूर विधानसभा मतदार क्षेत्राकरीता वंचित बहुजन आघाडीचे तडफदार उमेदवार अरविंद सांदेकर यांनी उमेदवारी अर्ज,निवडणूक निर्णय अधिकारी चिमूर यांच्याकडे दाखल केला.
वंचित बहुजन आघाडीच्या चिमूर प्रचार कार्यालयापासून,उमेदवारी अर्ज सादर करणारी रॅली काढण्यात आली व हि रॅली चिमूर वरोरा मुख्य मार्गाने मार्गक्रमण करीत असतांना महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुतळ्यास उमेदवार व इतर मान्यवर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.उमेदवारी अर्ज दाखल करताना माजी राज्यमंत्री डॉ.रमेशकुमार गजबे,चिमूर तालुका वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष स्नेहदीप खोब्रागडे सह इतर कार्यकर्तावर्ग व चिमूर विधानसभा मतदारसंघातील हजारो नागरिक,आयाबहिणी हजर होते.


भाजपाचे माजी चिमुर तालुका अध्यक्ष भाजपचे बंडखोर उमेदवार धनराज मुंगले

यांनी आपल्या समर्थकासह आज उमेदवारी अर्ज सादर केला.अर्ज सादर करण्यापूर्वी,चिमुर येथील महामार्गाने रॅली काढण्यात आली होती. या रॅलीत हजारो नागरिक सहभागी झाले होते. आजच्या दोन्ही उमेदवारीनी आपले नामांकन दाखल करून विदेमान आमदार व कांग्रेस समथित उमेदवारांना त्यांचा सामोर आव्हान उभे आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!