मतमोजणी केंद्र परीसरात भाजपा तालुका अद्यक्ष डॉ.दिलीप शिवरकर यांना जिवे मारण्याची धमकीचे पत्र सोशल मिडिया वर व्हायरल

मतमोजणी केंद्र परीसरात भाजपा तालुका अद्यक्ष डॉ.दिलीप शिवरकर यांना जिवे मारण्याची धमकीचे पत्र सोशल मिडिया वर व्हायरल


पळसगाव  -  प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे)

पळसगाव : - चिमुर विधानसभा - ७४ मतदार संघाची मतमोजणी २४ ऑक्टोबंरला दुपारी २ वाजता पुर्ण झाली.भाजपाचे उमेदवार बंटीभाउ भांगडीया हे विजयी झालेत. मतमोजणी नंतर चिमुर तालुक्याचे भाजपा अध्यक्ष डॉ. दिलीप शिवरकर  हे  विजयी उमेदवार बंटीभाऊ भांगडीया यांना अभीनंदन करण्याकरीता चिमुर येथील मतमोजणी केंद्र तहसील ऑफीस परीसरात पोहचले तेव्हा काही वेळ थांबल्यानंतर चिमुर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक धुळे साहेब हे डॉ.दिलीप शीवरकर यांच्याकडे येवुन सांगीतले की , तुम्हाला या परीसरात अज्ञात व्यक्तीकडुन मारहान होण्याची शक्यता असुन तुम्हच्या जीवीताला धोका आहे असे म्हणुन तुम्ही इथुन नीघुन जा असे म्हणाले . तेथुन लगेच नीघालो गेटपर्यंत सोडायला एक सहयक पोलीस निरिक्षक सुध्दा धुळे साहेबांनी दिले होते .
  पंरतु भाजपाच्याच उमेदवाराकडुन अनपेक्षीत दिलेल्या धमकीमुळे आश्चर्यचकीत भाजपाचे चिमुर तालुका अध्यक्ष डॉ.दिलीप शिवरकर झालेले आहेत.असल्या प्रकारची एक पत्र सोसिएल मिडिया वर व्हायरल झाले असून या पत्राची चर्चा मात्र होताना दिसत आहे.
   या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी चीमुरचे भाजपा तालुका अध्यक्ष डॉ.दिलीप शिवरकर यानी सुधीर मुनगटीवार , हरीशभाऊ शर्मा , भाजपाचे जिल्हा अध्यक्ष यांना पत्र लिहिले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!