श्रमिक एल्गारच्या अध्यक्षपदी राजेश्वर सहारे
श्री. सहारे यांचे नांव संघटनेचे उपाध्यक्ष विजय सिध्दावार यांनी सुचविले, तर केंद्रीय कमेटीचे सदस्य शशीकांत बतकमवार, अॅड. पारोमिता गोस्वामी यांनी अनुमोदन दिले.
यावेळी ब्रम्हपुरी निर्वाचन क्षेत्रात ॲङ पारोमिता गोस्वामी यांना सक्रिय पाठींबा देण्यांचा निर्णय घेण्यात आला, निवडणूकीतील अनामत रक्कम संघटनेच्या वतीने भरण्यात येईल असे नवनियुक्त अध्यक्ष राजेश्वर सहारे यांनी जाहीर केले.
ब्रम्हपुरी व्यतीरिक्त इतर विधानसभा क्षेत्रात संघटनेची भूमिका काय राहील याबाबत स्वतंत्र बैठकीत निर्णय यावेळी घेण्यात आला. श्री. राजेश्वर सहारे हे श्रमिक एल्गारचे 2010 ते 2015 या कालावधीत अध्यक्ष म्हणून कार्यरत होते. ते अध्यक्ष असतांनाच, चंद्रपूर जिल्हयात दारूबंदीचे आंदोलन यशस्वी झाले होते, हे येथे उल्लेखनीय.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!