पिकप च्या धडकेत विद्यार्थिनी जखमी
पिकप च्या धडकेत विद्यार्थिनी जखमी
बस स्टॉप वरील घटना
स्पीड ब्रेकर देण्याची नागरिकांची मागणी.
शंकरपुर (जगदीश पेंदाम)
येथील ऐश्वर्या दीपक वाढई वर्षे 13 राजीव गांधी कन्या विद्यालय शंकरपुर वर्ग 8 विद्यार्थिनी ला पीकने धडक दिल्याने जखमी झाली....
शाळा सुटल्यानंतर घरी जाऊन ट्युशन ला जात असताना कानपा मार्गे चिमूर कडे येत असलेल्या पिकप mh31,cb6176 ने बस स्टॉप वरती ऐश्वर्याला जोरदार धडक दिली त्यात ती गंभीर जखमी झाली असून दोन्ही हाताला मार लागला असुन गावातील नागरिक अमर दडवे व युवराज मुरस्कर यांनी प्राथमिक आरोग्य केंद्र शंकरपूर येथे उपचाराकरता तीला दाखल केले व फोनवरून डॉक्टरांना माहिती दिली डॉक्टरांनी प्रथम उपचार करून तिला पुढील उपचारासाठी नागपूर येथे रेफर करण्यात आले आहे.... शंकरपूर येथे विकास विद्यालय, राजीव गांधी विद्यालय, व नेहरु विद्यालय तीन शाळा असून या ठिकाणी मोठ्या प्रमाणात बाहेरील गावातील विद्यार्थी शिक्षणासाठी येत असून त्याठिकाणी स्पीड ब्रेकर देण्याची मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे...।



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!