कवी भोजराज कान्हेकर यांची राज्यस्तरीय नक्षत्र काव्यगौरव पुरस्काराकरीता निवड

कवी भोजराज कान्हेकर यांची राज्यस्तरीय नक्षत्र काव्यगौरव पुरस्काराकरीता निवड


गडचिरोली (प्रतिनिधी ) -  
    येथील सुप्रसिद्ध कवी तथा सामाजिक कार्यकर्ते भोजराज कान्हेकर यांची  राज्यस्तरीय नक्षत्र काव्यगौरव पुरस्काराकरीता निवड करण्यात आलेली आहे.  पुणे येथील नक्षत्राचं देणं काव्यमंच महाराष्ट्र  या काव्याला समर्पित असलेल्या संस्थेच्या वतीने हा सन्मान देण्यात येत असतो. याकरिता राज्यातील बारा  कवींची निवड करण्यात आलेली असून त्यात कान्हेकर यांचा समावेश करण्यात आलेला आहे. प्रस्तुत पुरस्कार येत्या २२सप्टेंबरला भोसरी पुणे येथील अंकुशराव लांडगे नाट्यगृह  कला दालन येथे महाराष्ट्राचे वित्त व गृह राज्यमंत्री दीपक केसरकर , खा. डाॕ. अमोल कोल्हे आदी मान्यवरांच्या उपस्थितीत  प्रदान  करण्यात येणार आहे. 
       भोजराज कान्हेकर हे व्यवसायाने गणित अध्यापक असून ते गेल्या  १४ वर्षापासून ते परिवर्तनवादी  काव्यलेखन करीत आहे.गडचिरोली  झाडीबोली साहित्य मंडळाचे ते कोषाध्यक्ष असून सायकल स्नेही मंडळाचेही पदाधिकारी आहे.  तथागताचा  धम्मविषयक विचारांचे ते गाढे अभ्यासक तसेच डाॕ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे ते  प्रचारक आहेत. विविध सामाजिक चळवळीत त्यांचा मोलाचा सहभाग आहे. त्यांच्या निवडीबद्दल ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर ,  कवयित्री कुसूमताई  अलाम, डाॕ. चंद्रकांत लेनगुरे , कवी प्रमोद राऊत, अंनिसचे  विलास निंबोरकर , उध्दव डांगे , प्रेमलता कान्हेकर , प्रमिला अलोणे, डाँ. पाटील, प्रा.पारखी, पुरूषोत्तम ठाकरे , राजकुमार शेंडे, बापू इलमकर , रामदास मेश्राम , ॲड. दादा वासनिक , प्रा. गौतम डांगे , श्रिनिवास गेडाम आदीं मित्रमंडळीनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!