जि.प. शाळा खैरी येथील मंजिल शेख शिक्षकाला तात्काल निलंबित करावे - शिव सेना ची मांगणी उप विभागिय अधिकारी यांना दिले निवेदन

जि.प. शाळा खैरी येथील मंजिल शेख शिक्षकाला तात्काल निलंबित करावे 

- शिव सेने ची मांगणी


उप विभागिय अधिकारी यांना दिले निवेदन

  
जांभुळघाट - प्रतिनिधी ( केवलसिंग जुनी )

  
जांभूळघाट : - चिमुर तालूक्यातील खैरी जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा येथील प्राथमिक शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असलेले मंजिल शेख हे शाळेत मध्यपान सेवन करून येतात. विदयार्थ्यांशी असभ्य वर्तन करतात. विद्यार्थीना  अश्लील शब्दात शिवीगाळ करतात. विद्यार्थीच्या पोटात चिमटे घेणे,मारहान करीत असल्याचा प्रकार विद्यार्थीच्या पालकवर्गानी केला आहे.
  हे प्रकार मागील तीन वर्षा पासुन सुरु असुन शाळा व्यवस्थापन समिती ने तक्रार दिल्या पण वरिष्टाकडून कोणत्याही प्रकार ची दखल घेण्यात आली नाही. पाच दिवसा पासुन शाळा बंद आहे . जो पर्यंत सदर शिक्षाकावर गुन्हया अंर्तगत कारवाही करून निलंबित  करीत नाही तो पर्यंत विद्याथीँना शाळेत पाठवणार नाही अशी पालक वर्ग व गावकऱ्यानी निर्णय घेण्यात आलेला आहे.
अनेक शाळा मध्ये शिक्षक हे मद्यपान करू येत असतात.अश्या शिक्षाकावर चौकसी करून  त्यांच्यावर सुध्दा कारवाही करण्यात यावी.जेने करून अश्या प्रकारची सामोर कोणत्याही घटना होणार नाही.शिव सेना द्वारे उपविभागीय अधिकाऱ्याला निवेदन देण्यात आले. शिक्षकावर फौजदारी गुणा नोंद करून तात्काल निलंबित करण्यात . अन्यत्या शिवसेना आपल्या पध्दतीने धडा शिकवेल. निवेदन देताना उपजिल्हा प्रमुख धरमसिंग वर्मा,उपतालूका प्रमुख केवलसिंग जुनी,गोटे इत्यादी शिवसैनीक यावेळी उपस्थीत होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!