विकास कामांचे लोकार्पण.
अहेरी ( सेवा पवार)
आलापल्ली येथे आज आमदार अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करोडो रुपयांच्या विविध विकासकामांचे लोकार्पण संपन्न झाले.
आज आलापल्ली येथील नागरिकांची दिवाळी असून अहेरी विधानसभा क्षेत्रातील आमदार अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते अनेक विकासकामांचे पायाभरणी व लोकार्पण करण्यात येणार आहे.
यात आलापल्ली येथील 2 कोटींचा बस स्थानकाचे पायाभरणी होणार आणि आलापल्ली 2.5 कोटी निधीतून येथील मुख्य चौक येथील सीसी रस्ता, मोद्दुमडगू येथील 7 कोटींच्या पीएचसी आणि आलापल्ली वीज वितरण विभागातील 50 कोटी निधीतून 132 केव्ही सब स्टेशन व टॉवर लाईनचे तसेच भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन राजे साहेब यांच्या हस्ते करण्यात येणार आहे.
अनेक वर्षांपासून रखडलेल्या कामांचे भूमिपूजन आज याठिकाणी होणार असून आलापल्ली येथील नागरिकांची आज दिवाळी असल्याची नागरिकांच्या वतीने बोलण्यात येत आहे.
विशेषतः आलापल्ली येथील बस स्थानकाचे अनेक वर्षांपासून अहेरी उपविभागातील नागरिक करीत आहेत.बस स्थानकाच्या रखडलेल्या कामामुळे नेहमी नागरिकांचे हाल होत होते यात पिण्याच्या पाण्याची सोय आणि सार्वजनिक मुत्रीघर आणि बसण्याची सोय नसल्याने अहेरी विभागातील नागरिक त्रस्त झाले होते आणि तसेच आलापल्ली शहरातील वीज पुरवठा वारंवार खंडित होत असल्याने नागरिकांची कामे तासोंतास रखडलेल्या अवस्थेत असायची परिणामी नागरिकांना आर्थिक दृष्टीने फटका पण बसायचा यासाठी स्थानिक आमदार अम्ब्रीशराव आत्राम यांच्या वतीने आलापल्ली येथे 133 केव्ही सब स्टेशनला मंजुरी देण्यात आली व तसेच आलापल्ली हे शहर अहेरी उपविभागात नावाजलेल्या शहरात येतो पण नागरिकाना आरोग्य सेवा देण्यासाठी उत्तम सोय नसल्याने पीएचसी मंजुरी देण्यात आली होती या सगळ्या कामांचे आज आमदार अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात येणार आहे तरी नागरिकांनी मोठ्या संख्येने कार्यक्रमात सहभागी व्हावं असे आव्हान भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी केला आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!