गेल्या पाच वर्षातील विकासाचा चढता आलेख पाहता चिमूर विधानसभेचा आमदार ,बंटीभाऊ भंगडीयाच मासळ मदनापूर जीप क्षेत्र कार्यकर्ता मेळाव्यातील सूर

गेल्या पाच वर्षातील विकासाचा चढता आलेख पाहता चिमूर विधानसभेचा आमदार ,बंटीभाऊ भंगडीयाच


मासळ मदनापूर जीप क्षेत्र कार्यकर्ता मेळाव्यातील सूर

पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )

पळसगाव : - दिनांक १९/०९/२०१९ चिमूर तालुक्यातील भारतीय जनता पार्टी मासळ मदनापूर जिल्हा परिषद क्षेत्रातील मौजा मांसळ येथिल सहकारी सोसायटी  येथे आज विधानसभा निवडणूक च्या संदर्भात पूर्वतयारी मनहून चिमूर विधानसभा तयारीसाठी आज भाजपा कार्यकर्ता मेळावा भाजपा मा,आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या प्रमुख उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली पार पडला. कार्यक्रमाच्या सुरवातीला  महापुरुषांच्या प्रतिमाना मालाअर्पण  करण्यात आली.  
विधानसभेची तयारी भारतीय जनता पार्टीच्या संघटना स्तरावर अतिशय जोरदारपणे सुरु आहे.  प्रमुख पदाधिकारी, मंडल अध्यक्ष, पक्ष विस्तारक, आघाडी प्रमुख, बूथ प्रमुख व शक्तीकेंद्र प्रमुख यांच्या मेहनतीने हा कार्यकर्ता मेळावा उत्कृष्ठ रित्या पाऊस येत असताना शुद्ध एवढ्या मोट्या कार्यकर्ता  उपस्थित  मध्ये पार पडत आहे  ही फार मोठी जमेची बाजू आहे,  यावेळी कोणत्याही परिस्थितीमध्ये  किंतु-परंतु याला वाव न देता कार्यकर्त्यांनी पक्ष आदेश म्हणून काम करून पक्ष निष्ठा जपली पाहिजे. आजपासून काही  दिवसांमध्ये विधानसभा  निवडणुकीच्या बिगुल वाजणार आहे तेव्हा सर्व कार्यकर्ता यांनी तयारीला जोमाने लागले पाहिजे. 
या वर्षीची निवडणुकीमध्ये विरोधकांची अनामत जप्त केल्याशिवाय राहणार नाही तरी कार्यकर्ते यांनी  सर्वांनी ताकदीने कामाला लागावे असे आवाहन केले. गेल्या पाच वर्षातील विकासाचा चढता आलेख पाहता चिमूर विधानसभेचा आमदार बंटीभाऊ भांगडीयाच होणार ही काळ्या दगडावरची रेष आहे, आजचा भाजपा कार्यकर्ता  मेळावाच्या उपस्थित मतदारावरून वरून दिसत आहे . विजय हेच ध्येय सर्वांनी ठेवले पाहिजे.
चिमूर मतदार संघात भरपूर प्रमाणात विकासाची कामे खेचून आणली असून निवडणूक पाहून सामाजिक उपक्रम करीत नसून समाजसेवा करीत आहे विरोधक केवळ दिशाभूल करीत असून मागील ६० वर्षात विकासाकडे तत्कालीन लोकप्रतिनिधी नी दुर्लक्ष का केले ?असा खडा सवाल करीत दिलेला शब्द पूर्ण करीत असून रक्षाबंधन हा १६ आगस्ट दरम्यान आल्याने त्या दिवशी रक्षाबंधन कार्यक्रम ठेवले यात काय चूक झाली असून बहिणींना भेट वस्तू रक्षाबंधन निमित्य देत असतो तेव्हा मातृशक्ती ची अफाट गर्दी असल्याने घरपोच भेटवस्तू देण्याचा शब्द दिला तेव्हा भेटवस्तू मिक्सर घरपोच देत आहे .जिल्हा परिषद अंतर्गत कामे साधे करू शकत नाही ते केवळ आरोप लावण्याचे काम करीत आहे  विरोधक मिक्सर  हे भ्रष्ट्राचार मधून दिल्याचा कांगाव करीत असून त्यांनी सिद्ध करून घ्यावा गेल्या ७ वर्षात १७९ कोटी इनकम टॅक्स भरला आहे . २००९ ला सत्ता कांग्रेस ची सत्ता होती तेव्हा पूर्ण चौकशी लावल्या होत्या परंतु कांग्रेस च्या काळात पूर्ण क्लीन चिट मिळाली होती मग मी भ्रष्ट्राचारी कसा असा प्रतिप्रश्न विरोधकाना केला . मतदार संघात विकासाची कामे करून नवीन दिशा देण्याचे काम करीत आहे .जातपात कडे न जाता माणुसकी पाहून विकास कोण करू शकतो या कडे आपले लक्ष असले पाहिजे .मोदी सरकारने चुलमुक्त ,शेतकरी सन्मान योजना ,पीक विमा योजना ,आदी विषयावर अनुदान देण्याचे काम केंद्र व राज्य सरकारने केले . चिमूर तालुक्यात कृषी विभाग १५० ट्रॅक्टर शेतकऱ्यांना देण्याचे काम केले . मासळ जीप क्षेत्रातील प्रलंबित  समस्या ९० दिवसात सोडविणार असल्याची सांगत सतत पाऊस पडल्याने ओला दुष्काळ जाहीर करणार असल्याची आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी ग्वाही दिली .
        मासळ मदनापूर जीप क्षेत्र संकल्प कार्यकर्ता मेळाव्यात आमदार बंटीभाऊ भांगडीया बोलत होते .यावेळी वसंत वारजूकर डॉ श्यामजी हटवादे ,बंडू नाकाडे ,बकाराम मालोदे, राजू देवतळे , नीलम राचलवार प्रकाश वाकडे ,डॉ देवनाथ गणधारे गुलाबराव फरकाडे ओमभाऊ गणोरकर विवेक कापसे मनिष तुम्प्लिवार  प्रवीण गणोरकर गजानन गुळध्ये , अशोक कामडी भाऊराव सूर जयंत गौरकर असिफ शेख देविदास जांभुळे,विनायक ठाकरे,राजू आत्राम मदनापूर सर्कल शक्ती प्रमुख,हाफिज शेख, जाणिक बन्सोड आदी उपस्थित होते .संचालन प्रा.राजू दांडेकर यांनी केले .जीप क्षेत्रातील महिला पुरुष मोठया प्रमाणात उपस्थित होती .

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!