वीज पडून महिला गंभीर जखमी.

 सोमेश्वर रेड्डीवार (मुल ग्रामीण)

विज पडून महिला गंभीर जखमी झाल्याची घटना मूल तालुक्यातील बेंबाळ येथे आज दुपारी तीन वाजता घडली. 

मूल तालुक्यातील बेंबाळ शेत शिवारात एका शेतात रोजंदारीने  निदण्याचे काम करीत असताना दुपारीअचानक पावसाला सुरुवात अशातच विजेचा आकाशात लपंडाव सुरू होऊन  विज पडून शेतात काम करीत असलेली मायाबाई केशव पुटावार वय 43 वर्ष ही महिला गंभीर जखमी झाली.

 ही घटना आज दिनांक 19 रोज गुरुवारला दुपारी 3 वाजताच्या सुमारास घडली . जखमींना तातडीने बेंबाळ येथील प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आले .मात्र त्यांची प्रकुर्ती गंभीर असल्याने उपजिल्हा रुग्णालय मूल येथे हलविण्यात आले.व त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!