नेरीत घरफोड्या करणारा अट्टल चोर पोलीसांच्या जाळ्यात
नेरीत घरफोड्या करणारा अट्टल चोर पोलीसांच्या जाळ्यात
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - चिमुर पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या नेरी येथे मागील वर्षांपासून घरफोडी करणाऱ्या अट्टल चोरट्यास गजाआड करण्यात नेरी पोलीसांना यश मिळाले आहे.पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार असे की आज दिनांक. १९/०९/२०१९ रोज गुरवारला दुपारी २ वाजताचे दरम्यान एक बंगाली व धोतर घातलेला नेरी येथील बुरड मोहल्यातील गुलाब महादेव बारेकर यांच्या घरी चोरी करण्याचे ईराद्याने घरी जावून पिण्याचे पाणी मागीतले तसेच गुलाब बारेकर यांच्या आई पार्बताबाईला नेरी मध्ये भजन मंडळी मिळेल का असे विचारले असता पार्वती बाईने तुम्ही कोणत्या गावचे आहात जी असे विचारले असता त्या चोराने मालेवाडा येथील असल्याचे सांगुन आमच्या गावचे भजन मंडळ मोडल्याने नेरी येथे आल्याचे सांगितले बिंग फूटायचे असल्याने योगायोगाने गुलाब बारेकर हे घरीच होते त्यांनी त्या इसमावर संशय बळावला त्यांनी त्याच्याकडे अधिक माहिती विचारण्याचा प्रयत्न केला असता त्या अट्टल चोरट्याची बोबळी वरल्याने उडवाउडवीची उत्तरे देवु लागला त्यामुळे त्या चोरट्यावर अधिक संशय आला ,नेरी मध्ये वर्षे भरापुर्वी दोन घरफोड्या झाल्या हे माहिती होती डिसेंबर २०१८ मध्ये मंगेश सुभाष कामडी यांच्या घरी व जुलै २०१९ मध्ये शोभा विनायक बानकर यांच्या घरी चोरी झाल्याचा सिसिटिव्ही वि डी ओ गुलाब बारेकर यांनी पाहीलेला होता त्यामध्ये एक बंगाली व धोतर घातलेल्या म्हाताऱ्याने चोरी केलेली असल्याने त्यांचा संशय बळावला त्यांनी लगेच नेरी पोलीस चौकीचे ईंचार्ज पोलीस उपनिरीक्षक किरण मेश्राम सर,यांना मोबाईल द्वारा माहिती देताच पोलीसांनी घटनास्थळ गाठले व त्या संशयीत ईसमास ताब्यात घेतले पोलिसांनी त्याच्याकडे चोरीबाबत विचारपुस केली असता चोराने आपले नाव रामक्रुष्ण हरेश्वर मोहल्ले वय ६२ वर्ष रा.लालगंज राऊत चौक,नागपूर असे सांगुन नेरी येथील वरील दोन्ही ठिकाणी चोरी केल्याची कबुली दिली आरोपीस गुन्ह्यात अटक केली असुन अधिक तपास मारोती ईंगवले उपविभागीय पो.अधिकारी चिमुर, ठाणेदार स्वप्नील धुळे सर,यांच्या मार्गदर्शनाखाली नेरी पोलीस चौकीचे ईंचार्ज पो.उपनिरीक्षक किरण मेश्राम सर,पोलीस कॉ. कैलास आत्राम,विनायक सरकुंडे,सचिन गजभिये तपास करीत आहेत नेरी येथे दिवसाढवड्या चोऱ्या करणारा चोरटा सापडल्याने गावामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!