पेंढरी इथे पोलिसांच्या व गावकरीच्या सहकार्याने पार पडली दारुबंदीची सभा

पेंढरी इथे पोलिसांच्या व गावकरीच्या सहकार्याने पार पडली दारुबंदीची सभा        

    
सिंदेवाही (अमोल निनावे)
तालुक्यातील सर्वात टोकावरचे व् नवरगाव पासून 10 ते 12 किलो मी अंतरावर असणारे पेंढरी या गावांत मोठ्यप्रमानात दारू सुरु होती. आणि त्यामुळे या गावातील लोक  पूर्णपणे त्रस्त झाले होते.आता या दारुविक्रेत्यांवर आळा घलण्याकरिता  अनेक पेंढरीच्या लोकांनी सिंदेवाहि पोलिस स्टेशनचे ठानेदार श्री.निशिकांत रामटेके यांच्या सोबत बोलून आपल्या गावातील समश्या सांगितल्या त्यामुळे लगेच दुसऱ्या दिवशी आपण तुम्हच्या गावात दारुबंदी विषयी सभा घेऊ असे बोलून दुसऱ्या दिवशी म्हणजेच आज भव्य पेंढरीतील लोकांची मिळून  ग्रामपंच्यातच्या हाल मधे सभा घेण्यात आली.या सभेमधे मोठ्या प्रमाणात पेंढरीतिल ग्रामपंच्यातचे सरपंच, उपसरपंच ,टंटामुक्तीचे अध्यक्ष माझी पोलिस पाटिल असे अनेक लोक हजर होते. या सभेचे अधक्ष्य सरपंच श्री यादवराव मेश्राम,प्रमुख पाहुने व् मार्गदर्शक सिंदेवाहि पोलिस स्टेशनचे ठानेदार श्री निशिकांत रामटेके व् सामाजिक युवा ब्रिगेड संघठनेचे प्रमुख श्री अमोल निनावे;माजी तंटामुक्तीचे अधक्ष्य श्री माणिक शेंडे,पोलिस मित्र निशाक शेंडे ,भास्कर गजभिये व् समस्त गवकरी आणि सर्व समाज कार्यकारिणी मंडळ मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.व् सर्वानुमते वार्ड नुशार समिति गठित करण्यात आले.या मुळे आता नवरगाव पासून दारुबंदीची सुरवात होत ती हळूहळू नैनपुर,रत्नापुर,धुमनखेळा आता पेंढरी या गावातील दारू बंदी होत आहे.त्यामुळे आता दारू विक्रेत्यांचे चांगलेच धाबे दनानले आहेत.

1 टिप्पणी:

  1. एकदमच सुंदर काम. वंदनीय राष्ट्रसंत म्हणतात की,
    मनुष्य निरोगी सात्विक असावा !त्यास व्यसनांचा उपद्रव नसावा!त्याचा व्यवहारही त्रासदायी न व्हावा!कोणाशीही !!
    मला जर माहीत असते तर मी निश्चितच सभेला हजर
    असतोच.धन्यवाद!

    उत्तर द्याहटवा

झिंदाबाद!