ग्रामगीता महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा सुवर्ण वाढदिवस साजरा

ग्रामगीता महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजनेचा सुवर्ण वाढदिवस साजरा


चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - दिनांक.२४ सप्टेंबर ला ग्रामगीता महाविद्यालय,चिमूर येथे राष्ट्रीय सेवा योजनेची ५० वर्षे पूर्तीबद्दल सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला. या कार्यक्रमप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान प्रा.पिसे सर यांनी भूषविले,प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.आनंदे सर यांनी धुरा सांभाळली. कार्यक्रमाप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजनेच्या  स्वयंसेवकांनी आपले अनुभव कथन केले.त्यामध्ये सुरज देशकर,विक्की गौरकर,अमर सहारे,नीता बावणे सर्वांनी आपले शिबिरातील अनुभव व्यक्त केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सातव सर यांनी केले. प्रा.आनंदे सर यांनी विद्यार्थ्यांमधील सळसळत्या रक्ताला जागृत कसे कराल याबद्दल मार्गदर्शन केले.अध्यक्षीय मार्गदर्शनात प्रा.पिसे सर यांनी विद्यार्थ्यांना राष्ट्रीय सेवा योजनेच्या ध्येय आणि महत्वाबद्दल जागृत करण्याचे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन अकिब शेख तर पाहुण्यांचे आभार दयश्री पिंपळकर यांनी पार  पाडले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!