भिसी ला नगर पंचायत चा दर्जा करून देणार - आमदार किर्तीकुमार भांगडीया

भिसी ला नगर पंचायत चा दर्जा करून देणार 
- आमदार किर्तीकुमार भांगडीया 

बसस्थानक भूमिपूजन समारंभ 
  

चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )


चिमूर : - भिसी व परिसरातील गावातील प्रवाश्यांसाठी बसस्थानक नव्हते  .अनेक वर्षांपासून बसस्थानक प्रश्न प्रलंबित होता त्या समस्येवर या पूर्वी च्या लोकप्रतिनिधी नी लक्ष दिले नव्हते .तेव्हा आमदार किर्तीकुमार भांगडीया यांनी बसस्थानक संदर्भात शब्द दिला होता . बसस्थानक हा केव्हाही होऊ शकत होऊ शकत होता परंतु बसस्थानक हा जुन्याच ठिकाणी व्हावा अशी सर्वांची मागणी होती .मागील निवडणुकीत भिसी क्षेत्रातून सर्वात जास्त मताधिक्य मिळाले होते .भिसी ला कधीही आश्वासन शब्द दिला नव्हतं परंतु भरपूर निधी दिला भिसी ला नगर पंचायत करण्याचा शब्द देत आमदार किर्तीकुमार भांगडीया म्हणाले की निवडणूक निकाल नंतर पाणी पुरवठा २ कोटी ची योजना पूर्ण करण्याचा शब्द दिला हायब्रीड अन्युटी योजनेतून एन.ए.जी. १४५ पॅकेज अंतर्गत बांधकाम  निधी १ कोटी चे भिसी येथील  बसस्थानकचे भूमिपूजन प्रसंगी आमदार किर्तीकुमार भांगडीया बोलत होते. 
यावेळी वसंत वारजूकर, भाजप जिल्हा उपाध्यक्ष डॉ.श्यामजी हटवादे बकाराम मालोदे ,निलम राचलवार, गुलाबरावजी फरकाडे, बापूराव बोमेवार, बापूजी यनगलवार ,गरीबाजी निमजे ,भिसी बसस्थानक संघर्ष समिती अध्यक्ष उमेश बोमेवार  ,ग्राम पंचायत सदस्य  राजू सातपुते ,सरपंच योगिता गोहणे ,उपसरपंच लीलाधर बनसोड, पस सदस्य प्रदीप कामडी ,गोपाल बलदुवा ,सचिन गाडीवार ,ईश्वर डुकरे , तेजने गुरुजी गोपीनाथ ठोंबरे एकनाथ थुटे सचिन फरकाडे विवेक कापसे आदी उपस्थित होते.  प्रास्ताविक पस सदस्य प्रदीप कामडी , संचालन ज्ञानेश्वर शिरभैय्ये  व आभार राजु बानकर यांनी केले. दरम्यान आमदार किर्तीकुमार भांगडीया यांचे वाद्यगजरात व फटाक्याच्या अतिषबाजीत स्वागत करण्यात आले .मोठया प्रमाणात नागरिकांची उपस्थिती होती .आयोजन भाजयुमो तालुका अध्यक्ष किशोर मुंगले जीप क्षेत्र भाजप प्रमुख नितीन गभने देवा मुंगले राजू बानकर अरविंद राऊत  विनोद खेडकर आकाश ढबाले  आदी कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

झिंदाबाद!