चिमूर ला १० गोदामे तयार करावी - आमदार बंटी भाऊ भांगडीया
चिमूर ला १० गोदामे तयार करावी
- आमदार बंटी भाऊ भांगडीया
बुलढाणा मल्टिस्टेट बँक चिमूर शाखेचे उदघाटन
चिमूर - प्रतिनिधी ( विलास मोहिनकर )
चिमूर : - चिमूर तालुक्यातील व्यापारी व शेतकऱ्यांसाठी बुलडाणा बँक ही सुरक्षित बँक आहे .बुलडाणा बँक ने सामाजिक उपक्रम म्हणून १० आरो मशीन सुद्धा पुरवठा केला आहे . तालुक्यातील खातेदार कर्जाची परतफेड करणारा असेल. शेतकऱ्यांसाठी १० हजार मेट्रिक टन चा गोदाम करावे जेणेकरून शेतकऱ्यांना लाभ घेता येईल .चिमूर शाखा प्रगतीकडे वाटचाल करेल असा आशावाद आमदार बंटीभाऊ भांगडीया यांनी व्यक्त केला.बुलढाणा अर्बन को ऑफ क्रेडिट लिमिटेड बुलडाणा मल्टिटेस्ट बँकेच्या चिमूर शाखेचे उदघाटन आमदार बंटीभाऊ भांगडीया यांच्या हस्ते झाले असून उदघाटन कार्यक्रमच्या वेळी बोलत होते.
यावेळी वसंत वारजूकर ,व्यापारी मंडळ अध्यक्ष प्रमोद बारापात्रे ,श्रीहरी बालाजी देवस्थान अध्यक्ष नीलम राचलवार बँक अध्यक्ष डॉ सुकेशजी झंवर ,सुशील कोठारी आदी उपस्थित होते .बुलढाणा क्रेडिट बँक अध्यक्ष सुकेश झंवर म्हणाले की बुलडाणा बँक ही १९८६ पासून १२ हजार रुपयांपासून सुरू झाली असून ४४७ शाखा असून ४ राज्यात कार्यरत आहे .गावे दत्तक घेतली रस्ते केली असे अनेक उपक्रम आहे . १६ लाख सभासद असून त्यात शेतकरी ,कर्मचारी व व्यापारी समाविष्ट आहे .सभासदाच्या प्रगतीसाठी काम करीत असताना सोशल बँकिंग ची कल्पना अमलात आणली विविध योजना सांगितल्या .
निलम राचलवार म्हणाले की चिमूर मध्ये २ बँका झपाट्याने वाढल्या त्याच झपाट्याने मागे पडल्याने ग्राहकांचे पैसे डूबले असा प्रकार घडला कर्ज घेत असताना ग्राहकांनी सुरळीत कर्ज फेड केल्यास बँक चे उत्पन्न वाढून विकास होईल. वसंत वारजूकर म्हणाले की बुलडाणा अर्बन बँक ही राज्यात नावलौकिक असलेली बँक आहे चिमूर च भाग्य आहे की सहकार क्षेत्रातील बँक येत असून व्यापारी व ग्राहकांना लाभ घेता येईल विकास होईल .संचालन प्रा राजू दांडेकर यांनी केले.व्यापारी व ग्राहक वर्ग उपस्थित होते .



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!