आम आदमी पार्टीच्या पहिल्या यादीत पारोमिता गोस्वामी यांचे नाव ब्रह्मपुरी विधानसभेतून दिली उमेदवारी
आम आदमी पार्टीच्या पहिल्या यादीत पारोमिता गोस्वामी यांचे नाव
ब्रह्मपुरी विधानसभेतून दिली उमेदवारी
पळसगाव - प्रतिनिधी ( विकास खोब्रागडे )
पळसगाव : - महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०१९ साठी आज आम आदमी पक्षाच्या वतीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर करण्यात आली. यात ब्रह्मपुरी विधानसभा क्षेत्रातून एडवोकेट पारोमिता गोस्वामी यांना तिकीट जाहीर करण्यात आली आहे.
राज्यभरातून अनेक इच्छुकांचे अर्ज मोठ्या संख्येने राज्य पक्ष कार्यालयाकडे जमा झाले होते. त्यानंतर छाननी प्रक्रिया आणि पक्षाची केंद्रीय स्तरावरील पॉलिटिकल अफेअर्स कमिटी यांच्याशी कमिटी यांच्याशी सल्लामसलत करून राज्य प्रचार समितीने उमेदवारांची यादी बनवली आहे.
आम आदमी पक्षाचा 'स्वच्छ राजकारण' आणि अशी 'नवी राजकीय संस्कृती' बनवण्यावर भर आहे. यामध्ये नागरिकांचे मूलभूत गरजेचे मुद्दे हे केंद्रस्थानी असतील. समाजामधील हुशार, कर्तबगार, उत्तम चारित्र्याच्या आणि जनतेसाठी खऱ्या अर्थाने जमिनीवर उतरून प्रामाणिकपणे काम करणाऱ्या लोकांना तिकीट देऊन जनतेला खरे प्रतिनिधीत्व देण्यावर आम आदमी पक्षाचा विश्वास आहे. आम आदमी पक्ष ही विधानसभा निवडणूक लढवत आहे.या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी आम आदमी पार्टीने उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे.
पारोमिता गोस्वामी (४९)( ब्रम्हपुरी विधानसभा, चंद्रपूर जिल्हा ) यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. ऍड. पारोमिता गोस्वामी या गेल्या २० वर्षांपासून विदर्भातल्या खेड्या-पाड्यांमध्ये असंघटीत क्षेत्रातील कामगारांसाठी काम करत आहेत. चंद्रपूर जिल्ह्यातील दारूबंदी मोहिमीमध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. आदिवासीयांच्या जमीनेचे हक्क व वन हक्क, तसेच महिला व बालकांच्या मुद्द्यांवर सातत्यपूर्ण चळवळीचे नेतृत्व त्यांनी केली आहे. आयबीएन कङून दिल्या जाणाऱ्या 'महाराष्ट्रीयन ऑफ द इअर', 'महात्मा गांधी व्यसनमुक्ती' पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेले आहे. पारोमिता यांना येल विद्यापीठाच्या जागतिक फेलोशिप व अशोक फेलोशीप दिली गेली आहे. बि.ए. सेंट झेव्हिअर कॉलेज, कोलकाता आणि टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सस मधून मास्टर्स इन सोशल वर्क मुंबई येथून शिक्षण घेतल्यानंतर नागपूर विद्यापीठातून त्यांनी एल.एल.बी. ची पदवी प्राप्त केली आहे मागील २० वर्षांपासून आदिवासी असंघटित शेतकरी शेतमजूर कामगारांसाठी काम करीत आहेत. या विधानसभा क्षेत्रातून राज्याचे विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार प्रतिनिधीत्व करीत असून, त्यांच्याशी थेट लढत होणार आहे.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
झिंदाबाद!